इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल २०२०) यंदा कोविड-१९मुळे दुबईत आयोजित केले जाणार आहे. भारतात कोविड-१९ची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्यामुळे भारत सरकारने बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन दुबईत करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०मध्ये खेळाडू त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जाऊ शकतील का नाही? हा प्रश्न सर्वांना सतावत होता. पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
काही रिपोर्टनुसार बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रमंडळींना सोबत नेण्याचा निर्णय फ्रंचायझीवर सोपवला आहे. परंतु, जैव सुरक्षित प्रोटोकॉल सर्वांसाठी सारखे असतील, असे त्यांनी म्हटले आहे. खेळाडूंच्या कुटुंबाला किंवा मित्रांना जैव सुरक्षित वातावरणाच्या बाहेर जाऊन कुणालाही भेटण्याची परवानगी नसेल. इतर खेळाडूंच्या कुटुंबियांशी भेटतानाही त्यांना सामाजिक अंतर राखावे लागेल. त्यांना नेहमी मास्क घालूनच रहावे लागेल. BCCI Decision On Players Family To Attend Tournament In Dubai
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “खेळाडूंच्या कुटुंबियांना खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त सामना किंवा सरावादरम्यान मैदानावर जाण्याची अनुमती नसेल. जो कोणी जैव सुरक्षित प्रोटोकॉलचे उल्लंघन करेल, त्याला ७ दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागले. तसेच, जैव सुरक्षित वातावरणात परत येण्यासाठी त्यांना ६व्या आणि ७व्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागेल.”
बीसीसीआयने आयपीएल दरम्यान दर ५व्या दिवशी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर, दुबईत सराव करण्यासाठी जाण्यापुर्वी खेळाडूंना भारतात ५ वेळा कोरोना चाचणी करावी लागेल आणि पाचही चाचणीमध्ये खेळाडू निगेटिव्ह आढळल्यास ते दुबईला जाऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
आयपीएल २०२० खेळणार नाही, सर्वाधिक चर्चेत असलेला मिचेल स्टार्क, न खेळण्याचे…
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने
ट्रेंडिंग लेख –
धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष
क्रिकेटच्या टी-२० प्रकारात सर्वाधिक चेंडू खेळणारे ७ क्रिकेटर, २ आहेत भारतीय