मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा अनेकदा माजी कर्णधार एमएस धोनीवर वादग्रस्त वक्तव्य करत असतो. गंभीरने शनिवारी स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टड’ या कार्यक्रमात धोनीविषयी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
गौतम गंभीर म्हणाला की, “कोणत्याही खेळाडूची खेळण्याची मर्यादा त्याचा फिटनेस निश्चित करते ना की त्याचे वय. धोनी अजूनही तंदुरुस्त असेल आणि फॉर्मात असेल तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहावे.”
तो म्हणाला, ‘वय हा तर केवळ आकडा आहे. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल आणि चांगले फटके मारत असेल तर खेळण्यात काहीच हरकत नाही. धोनी चांगल्या फॉर्मात आहे आणि तो खेळाचा आनंद घेत आहे. विशेषतः सहा आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करून तो अजूनही देशासाठी सामना जिंकू शकतो, असे त्याला वाटत असेल तर त्याने सतत खेळले पाहिजे. कोणीही त्याला निवृत्तीसाठी भाग पाडू शकत नाही. अनेक तज्ज्ञ वयासाठी धोनीसारख्या खेळाडूंवर दबाव आणू शकतात. परंतु हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.”
7 जुलै 2020 रोजी धोनी 39 वर्षांचा झाला आहे. त्याने मागील वर्षी झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्यफेरीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे युएईमध्ये आयपीएल 2020 स्पर्धा भरविण्याबाबत गंभीर म्हणाला, ‘आयपीएल कुठे होत आहे, हे महत्त्वाचे नाही. आयपीएल स्पर्धा भरवणे हेच महत्त्वाचे होते. युएईमध्ये खेळण्यासाठी उत्तम जागा आहे. यामुळे लोकांचा मूडही बदलेल.’
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर १६ वर्षांनंतर मोहम्मद कैफने ‘त्या’ चुकीसाठी मागितली संघसहकाऱ्याची माफी
-स्टीव्ह बकनरवर पठाण भडकला, बकनर तुम्ही चुका नाही केल्या तुम्ही तर…
-१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्
ट्रेंडिंग लेख-
-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी