मुंबई । पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते आणि पहिल्याच सामन्यात दमदार शतक ठोकले होते. नुकतेच इमाम-उल-हकने खुलासा केला की, त्याच्या पदार्पण सामन्यात शानदार फलंदाजी करूनही त्याला घराणेशाहीच्या आरोपाचा सामना करावा लागला आणि तो बाथरूममध्ये शॉवरखाली तासंतास रडत राहिला.
एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलतांना इमामने सांगितले की, ‘चाहत्यांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपामुळे मी खूप दुखवला गेलो होतो. जेव्हा हे सर्व सुरु झालं तेव्हा मी दौऱ्यावर होतो. एकटा बसून जेवायचो. मी जेव्हा जेव्हा फोन उघडायचो तेव्हा लोक सोशल मीडियावर माझ्याबद्दल असेच लिहित असत. मी खचलो होतो, काय करावे ते समजू शकले नाही. मला आठवत की मी बाथरूममध्ये तासंतास रडत होतो.’
तो म्हणाला की, ‘हेच विचार माझ्या मनात यायचे की मी अद्याप खेळलेलो नाही, तरीही लोक असे म्हणत आहेत. जर मी खेळलो आणि चांगले प्रदर्शन करू शकलो नाही तर? मग माझी कारकीर्द संपेल. मी माझ्या खोलीच्या बाहेर एक पाऊल ठेवू शकणार नाही. मला भीती वाटत होती की लोक माझे नुकसान करतील, कारण दुबईमध्ये पाकिस्तानी समाजातील बरेच लोक आहेत.’
इमामने आत्तापर्यंत 37 एकदिवसीय सामन्यांमध्ये 53.84 च्या सरासरीने 1723 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 7 शतके , 6 अर्धशतके ठोकली. यात त्याच्या सर्वोच्च 151 धावांची खेळीचा देखील समावेश आहे. कसोटीमध्ये इमामने 11 सामन्यांच्या 21 डावांमध्ये 3 अर्धशतकांसह 25.5 च्या सरासरीने 485 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने केवळ 2 सामने खेळले असून त्यात त्याने 21 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा हा युवा खेळाडू कमावतोय आफ्रिदीच्या तुलनेत आयपीएलमध्ये ३ पटीने अधिक रूपये
काॅफीही नशीबात नाही, कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरने व्यक्त केली खंत
धोनीला गौतमने दिला ‘गंभीर’सल्ला; जोपर्यंत आहे फिट तोपर्यंत…
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू