नुकतीच इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका पार पडली आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने पाहुण्या श्रीलंका संघाचा ३-० ने धुव्वा उडविला. या मालिकेनंतर आता श्रीलंका संघासमोर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचे आव्हान असणार आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड संघाने श्रीलंका संघावर ५ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंका संघाकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले होते. एका खेळाडूला तर वाढदिवसाच्या दिवशी पदार्पण करण्याची संधी मिळाली. परंतु तो संधीचे सोने करण्यात अपयशी ठरला आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाकडून ३ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे चरिथ असलांका. त्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी (२९ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
सुदैवाने असलांकाला वरच्या फळीत फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु तो ६ चेंडू खेळून भोपळाही न फोडता माघारी परतला. (24 years old srilankan Batsman charith asalanka got out on duck on his birthday)
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाला सर्वबाद १८५ धावा करण्यात यश आले होते. यामध्ये कुसल परेराने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली होती. तर वहिंदू हसरंगाने ५४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. तसेच इंग्लंड संघाकडून ख्रिस वोक्सने अवघ्या १८ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते.
श्रीलंका संघाने दिलेल्या १८६ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाकडून जो रूटने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावांची तुफानी खेळी केली. तसेच जॉनी बेअरस्टोने ४३ धावांचे योगदान दिले. श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना, दुष्मांता चमिरा याने ५० धावा खर्च करत ३ गडी बाद केले. हा सामना इंग्लंड संघाने ९१ चेंडू आणि ५ गडी शिल्लक असताना आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पृथ्वी शॉनंतर ‘ही’ भारतीय क्रिकेटर डोपिंग प्रकरणात दोषी, ४ वर्षांसाठी झाली बॅन
कसोटी चँपियनशीपच्या गुण पद्धतीत बदल, स्लो ओव्हर रेटमुळे अंतिम सामन्याचा मार्ग होणार बंद!
टीम इंडियाला गवसली यशाची किल्ली, बड्या खेळाडूने दिला विजयाचा कानमंत्र