आयपीएल 2024 च्या आधी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर विवाहबंधनात अडकला आहे. मिलर येत्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघासाठी खेळताना दिसेल.
डेव्हिड मिलर हा जगातील सर्वात विध्वंसक फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्यानं 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं होतं. आयपीएल 2013 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना त्यानं स्फोटक फलंदाजी करून नाव कमावलं होतं. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्यानं केवळ 35 चेंडूत शतक झळकावलं आहे. 34 वर्षीय मिलरनं त्याच्या मैत्रिणीशी लग्नाची गाठ बांधली आहे.
डेव्हिड मिलरनं त्याची गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिसशी लग्न केलं. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये दोघांचं लग्न झालं. आयपीएलदरम्यान हॅरिस डेव्हिडला चिअर करताना दिसली आहे. कॅमिला हॅरिस ही देखील डेव्हिड मिलरसारखीच ॲथलीट आहे. तिच्या इंस्टाग्राम बायोनुसार, ती एक पोलो खेळाडू आहे. तिनं पोलो खेळतानाचे अनेक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
डेव्हिड मिलर आणि कॅमिला हॅरिस यांच्या लग्नाला क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक मार्क बाउचर देखील उपस्थित होते. डी कॉक आणि मिलर यांनी एकत्र खूप क्रिकेट खेळलं आहे.
डेव्हिड मिलर आणि कॅमिला हॅरिस यांची ऑगस्टमध्ये एंगेजमेंट झाली होती. मिलरनं कॅमिलाला झिम्बाब्वेच्या मपाला जेना येथे प्रपोज केलं होतं. हे ठिकाण झिम्बाब्वेच्या झाम्बेझी नॅशनल पार्कमध्ये आहे. मिलर आणि कॅमिला या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. काही व्हिडिओंमध्ये ते दोघं डान्स करतानाही दिसत आहेत.
डेव्हिड मिलर हे जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेकडून 173 वनडे सामन्यात 42.06 च्या सरासरीनं 4458 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 103.31 एवढा राहिला. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे 6 शतकही आहेत. मिलर दक्षिण आफ्रिकेकडून 116 टी-20 सामने खेळला. या दरम्यान त्यानं 33.88 ची सरासरी आणि 144.68 च्या स्ट्राइक रेटनं 2270 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video : हॅन्डल राहिलं हातात अन् बॅट निघाली फिरायला! तात्या’ पोलार्डसोबत हे काय झालं, पाहा व्हिडिओ
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? दुबईत होणार महत्त्वाची बैठक