इंग्लंड कसोटी संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. उभय संघांतील कसोटी मालिका गुरुवारी (1 डिसेंबर) रावलपिंडीमध्ये खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्याताला 24 तासांपेक्षा कमी वेळ राहिला असताना पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या क्वेटा शहरात पोलिसांच्या गाडीवर बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. इंग्लंड संघासाठी ही चिंता वाढवणारी घटना म्हणता येऊ शकते.
इंग्लंडला या पाकिस्तान दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याआधी इंग्लंडच्या खेळाडूंची तब्येत खालावल्याची माहितीही दिली गेली आहे. अशातच पोलिसांच्या गाडीवर बॉम्बस्फोट झाल्यामुळे संघाची चिंता अधिकच वाढली आहे. या बॉम्बस्फोटात एक पोलिस अधिकारी आणि त्याच्यासह तीन इतर व्यक्तींनी जीव गमावल्याचेही सांगितले जात आहे. लोकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांवर अशा प्रकारे हल्ला होत असल्यामुळे चाहते खेळाडूंविषयी सुरक्षेविषयी सुरक्षा व्यक्त करत आहेत.
बॉम्बस्फोटमुळे पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेला धोका!
पाकिस्तानच्या क्वेटा शहराच्या डीआयजीनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, हा घल्ल्यात 24 लोक जखमी झाले आहेत, यापैकी 20 पोलिस अधिकारी आहेत. दरम्यान, हा हल्ला पाकिस्तान आणि इंग्लंडच्यातील कसोटी मालिकेसाठी चांगली बातमी नक्कीच म्हणता येणार नाही.
दरम्यान, मोठ्या काळानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या कसोटी संघासाटी हा पहिला नाही, तर दुसरा मोठा झटका आहे. या बॉम्बस्फोटाआधी इंग्लंडच्या संघातील 14 खेळाडूंची तब्येत खावल्याचे समोर आले आहे. यामध्या त्यांच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याचाही समावेश आहे. खेळाडूंना पाकिस्तानमध्ये आल्यानंतर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 1 डिसेंबर रोजी सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना 9 डिसेंबरपासून मुलतान शहरात खेळला जाणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 17 डिसेंबरपासून कराची शहरात सुरू होईल. (A bomb has exploded in Pakistan before the start of the Test series against England)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतला का दिली जात आहे जास्त संधी? वीवीएस लक्ष्मणने केला खुलासा
पावसाच्या व्यत्ययाने तिसरी वनडे रद्द! 1-0 ने मालिका यजमान न्यूझीलंडच्या नावे