रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध रत्नागिरी अरावली ॲरोज यांच्यात आजची चौथी लढत झाली. रत्नागिरी संघाने सुरुवाती पासून आक्रमक खेळ करत सामना एकतर्फी केला. रत्नागिरी संघाने मध्यांतराला लातूर संघावर दोन लोन पाडले. रत्नागिरी कडून श्रेयस शिंदे व साईराज कुंभार ने चतुरस्त्र चढाया केल्या.
मध्यंतराला रत्नागिरी अरावली ॲरोज संघाकडे 28-11 अशी आघाडी होती. तर मध्यांतरला रत्नागिरी कडून भूषण गुढेकर ने 4 पकडी केल्या. मध्यांतरला नंतर रत्नागिरीच्या श्रेयस शिंदे व साईराज कुंभार ने सुपर टेन पूर्ण करत आघाडी भक्कम केली.
रत्नागिरी संघाने 54-24 असा एकतर्फी सामना जिंकला रत्नागिरी कडून साईराज कुंभार ने 13 तर श्रेयस शिंदे ने 12 गुण मिळवले. भूषण गुढेकर ने 7 पकडी केल्या. लातूर कडून अतुल भराडे ने 9 गुण मिळवले. तर राहुल चव्हाण ने अष्टपैलू खेळ केला. (A one-sided victory for Ratnagiri Aravali Arrows)
बेस्ट रेडर- साईराज कुंभार, रत्नागिरी अरावली ॲरोज
बेस्ट डिफेंडर्स- भूषण गुढेकर, रत्नागिरी अरावली ॲरोज
कबड्डी का कमाल- तुषार माने, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायगड मराठा मार्वेल्स विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस सामना बरोबरीत
रेलीगेशन फेरीत नंदुरबार हिमालयन ताहर्स संघाचा दुसरा विजय