क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं फारंच जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकार यांचे परस्पर संबंध असतात. या दोन क्षेत्रांतील व्यक्तींनी एकमेकांना आपले जीनवसाथी म्हणून निवडले आहेत. विशेष म्हणजे यात नाव घ्यायचं झालं तर, टायगर पतौडी म्हणजे मन्सूर अली खान पतौडी आणि बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री शर्मिला टागोर. याव्यतिरिक्त ताजं उदाहरण घ्यायचं झालं, तर त्यात आपण विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याही नावाचा उल्लेख करू शकतो. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी हिला भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू खूप जास्त आवडतो. याबाबत तिने तब्बल २ वर्षांपूर्वीच सांगितले होते.
सनी लिओनीला आवडतो हा भारतीय क्रिकेटपटू
सन २०१९ मध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला एक प्रश्न विचारला होता. तिला विचारले होते की, “तुझा सर्वात आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण आहे?” यावर प्रत्युत्तर देताना सनीने ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीचे नाव घेतले होते.
सनीने सांगितले धोनी आवडण्याचे कारण
धोनी आपल्याला का आवडतो यामागील कारण सांगताना सनीने त्याचे शानदार नेतृत्त्वगुण सांगितले नाही, तर त्याचा घरंदाज स्वभाव आपल्याला सर्वाधिक आवडत असल्याचे सनीने सांगितले होते. सनी लिओनीने आपल्याला धोनी का आवडतो याचे कारण सांगताना म्हटले होते की, “मला वाटते की, त्याच्याकडे सर्वात क्यूट मुलगी आहे ना? मी त्याला पाहत असते, तो आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करतो आणि हे खूपच भारी वाटते. तो माझा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. कारण तो एक फॅमिली मॅन आहे.”
एमएस धोनीचे कुटुंब
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने ४ जुलै, २०१० रोजी साक्षी रावत हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना झिवा ही मुलगी आहे. धोनीचे कुटुंब अनेकदा आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएल सामन्यांना हजेरी लावताना दिसतात. याव्यतिरिक्त धोनी सोशल मीडियावर फार सक्रिय नसला, तरीही त्याची पत्नी साक्षी मात्र व्यक्त होत असते. ती नेहमीच आपल्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२०चं मैदान गाजवणारे ‘हे’ शिलेदार प्रथमच खेळतायत पीएसएल, रिषभच्या धुरंधराचाही समावेश
इथेही कोहलीच ‘किंग’! WTCच्या विजेत्या संघाची बक्षीस रक्कम, विराटच्या आयपीएल मानधनापेक्षाही कमी
लिटल मास्टरच्या मते, ६०-७०चे दशक गाजवणारे ‘ते’ दिग्गज आजही जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू