विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. तसेच या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ओली रॉबिन्सनला निलंबित करण्यात आले आहे.
रॉबिन्सनने २०१२ -१३ मध्ये वर्णद्वेषी ट्विट केले होते, जे काहीदिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ईसीबीने त्याला या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संघातील इतर खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जेम्स अँडरसनचेही एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने ब्रॉडला लेस्बियन म्हटले होते. हे ट्विट अँडरसनने आता डिलीट केले आहे.
जेम्स अँडरसनने हे ट्विट २०१० मध्ये केले होते. त्यावेळी त्याने ब्रॉडबद्दल भाष्य केले होते. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “मी आज पहिल्यांदा ब्रॉडचा नवीन हेअरकट पहिला आहे. मला याबद्दल खात्री नाही. विचार केला की तो १५ वर्षाच्या लेस्बियनसारखा दिसत आहे.” या ट्विटबाबत स्पष्टीकरण देताना जेम्स अँडरसन म्हणाला, “हे ट्विट १० ते ११ वर्ष जुने आहे. मी एक व्यक्ती म्हणून पूर्णपणे बदललो आहे. मला वाटतं की हे कठीण आहे. परंतु गोष्टी बदलत असतात आणि तुम्ही चुका करत असता.”
आणखी काही खेळाडूंचे ट्विट होत आहेत व्हायरल
ओली रॉबिन्सला निलंबित केल्यानंतर जेम्स अँडरसनसह ओएन मॉर्गन, जोस बटलर, जो रूट इतर इंग्लिश क्रिकेटपटूंचे देखील ट्विट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. त्यामुळे या खेळाडूंच्या चिंतेत वाढ होऊ शकते. कारण ईसीबी तर्फे या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार आहे.
ईसीबी करणार कसून चौकशी
एक दिवसापूर्वीच ईसीबीने म्हटले होते की, “ओली रॉबिन्सनच्या प्रकरणानंतर आम्ही सतर्क झालो आहोत. त्यामुळे आणखी काही खेळाडूंनी भूतकाळात केलेले काही ट्विट असतील ज्यावर सार्वजनिकरित्या प्रश्न उपस्थित केले जातील. त्यावर आमचे लक्ष असणार आहे. या खेळात भेदभावाला कुठलेही स्थान नाही. आम्ही आवश्यक पावले उचलण्यास वचनबद्ध आहोत. हे केवळ एकच प्रकरणाशी संबंधित बाब नाही. तसेच सर्व वस्तुस्थितीचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे न्यूझीलंडविरुद्ध आर अश्विन ठरु शकतो टीम इंडियाचे प्रमुख शस्त्र
भारत-न्यूझीलंड संघातील ‘या’ ५ खेळाडूंमध्ये आहे खास नाते; १३ वर्षांपासून करत आहेत एकमेकांचा पाठलाग