भारतीय पुरूष संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकला. ही दुखापत त्याला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यावेळी झाली होती. आता तो बरा होत असून दुसऱ्या कसोटीत संघपुनरागमन करण्याची शक्यता आहे. बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला ढाकामध्ये खेळला जाणार आहे, मात्र त्याच्या येण्याने शतकी खेळी करणाऱ्या शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या स्थानावर संकट येणार आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात येणार का? यावर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनी चकित करणारे उत्तर दिले. गिल पहिल्या कसोटीच्या अंतिम अकरासाठी गणला गेला जात नव्हता, जोपर्यंत रोहित सामन्यातून बाहेर पडला नाही. त्या संधीचे त्याने सोने केले आणि कारकिर्दीत पहिले कसोटी शतक झळकावले.
गिलशिवाय पुजारानेही शतकी खेळी करत बांगलादेशला 513 धावांचे लक्ष्य देण्यात महत्वाची भुमिका बजावली. हे त्याचे 52 डावानंतर आणि कसोटीतील जलद शतक ठरले. रोहित जर परतला तर त्याची संघात जागा निश्चित आहे कारण तो संघाचा कर्णधार आहे. तसेच पुजाराने शतक केल्याने गिलला त्याच्याजागी खेळवता येणार नाही. यामुळे भारताला दुसऱ्या कसोटीसाठी संघ निवडताना कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. “रोहितने नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्येच राहावे आणि पूर्णपणे फिट व्हावे,” असे जडेजा म्हणाले.
सोनी स्पोर्ट्सवर बोलताना जडेजा म्हणाले, “म्हणूनच म्हणत आहे रोहितला म्हणा घरात बस. जेव्हा खेळाडू हाताच्या दुखापतीतून सावरत असतो आणि त्याला 10 दिवस बॅटच नाही पकडता येते, तो कसा काय लवकर संघात येऊ शकतो. त्या खेळाडूला 10–15 दिवस पूर्णपणे फिट होण्यासाठी लागतात. यामुळेच मी म्हणत आहे त्याची दुखापत किती खोल ही माहित नसून त्याने आराम करावा.”
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाकामध्ये खेळला जाणार आहे. हा दौऱ्यातील शेवटचा सामना असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | पोज देत बसला आफ्रिकी फलंदाज, स्टार्कने घातक चेंडू टाकून उडवला त्रिफळा
ऑस्ट्रेलियाच्या विजयावर भडकला वीरेंद्र सेहवाग! सोशल मीडियावर पोस्ट करत मारला टोमणा