जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने शानदार अर्धशतक साजरे करत भारतीय संघाचा डाव सावरला. तब्बल दीड वर्षानंतर पुनरागमन करत असलेल्या रहाणेने काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आयपीएलमध्ये देखील दमदार प्रदर्शन केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय भारताचा माजी कर्णधार व चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याला दिलेले.
भारतीय संघाचे प्रमुख सहा फलंदाज बाद झाले असताना त्याने शार्दुल ठाकूरसह संघाचा डाव सावरला. दोघांनी सातव्या गड्यासाठी 109 धावा केल्या. रहाणेने पहिल्या डावात 129 चेंडूंचा सामना करताना 89 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार व एका षटकारांचा समावेश होता.
भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर रहाणे याने संपूर्ण देशांतर्गत क्रिकेट हंगामात सहभाग घेतलेला. तिथे त्याने एक शतक व चार अर्धशतके साजरी केलेली. मात्र, आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा भाग झाल्यानंतर त्याच्यात मोठा बदल दिसून आला. रहाणेने या हंगामातील 14 सामन्यांमधील 11 डावांमध्ये 326 धावा केल्या. 71* ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. या धावा रहाणेने 32.60च्या सरासरीने आणि 172.48च्या स्ट्राईक रेटने केल्या.
मुंबई विरुद्ध आक्रमक अर्धशतक ठोकल्यानंतर राहणे म्हणाला होता,
“माही भाईने मला सांगितले होते की, केवळ खेळाचा आनंद घे, कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नको. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती.”
आयपीएलमधील याच कामगिरीनंतर राहणे याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले. त्यानंतर आता अर्धशतक झळकावून त्याने आपली निवड योग्य ठरवली.
(Ajinkya Rahane Open Up What MS Dhoni Change His Mentality In IPL 2023)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स