तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा खेळली जाणारी आशिया चषक (Asia Cup) स्पर्धा 2022 त्याचे महत्व टिकवून आहे. सध्या सुरू असलेल्या 15व्या आशिया चषकाचा हंगाम संयुक्त अमिराती येथे खेळला जात आहे. एकूण सहा संघांच्या या स्पर्धेचे सुपर फोरचे सामने खेळले जात आहेत. यामध्ये रविवारी (4 सप्टेंबर) दुबई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जात आहे. यामध्ये पुन्हा एकदा अनुभव कशाला म्हणतात हे भारताचा फलंदाज विराट कोहली याने सिद्ध केले आहे. त्याचबरोबर त्याने एक पराक्रमही केला आहे.
भारताचा विश्वासाचा फलंदाज विराट कोहली ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बराच आऊट ऑफ फॉर्म होता. त्याने या स्पर्धेतील भारताच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 35 धावा केल्या. त्यानंतर हाँगकाँग विरुद्ध नाबाद 59 धावा केल्या. यावरून तो फॉर्ममध्ये परतला असे म्हटले जाऊ लागले. तर आता सुपर फोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध 60 धावा केल्या. ही विशेष खेळी करताना त्याने पाकिस्तानविरुद्ध खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
ही खेळी करताच विराट मोठ्या आंतरराष्ट्रीय टी20 स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध 2022मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धांमध्ये टी20 विश्वचषक आणि आशिया चषकाचा समावेश आहे. तसेच त्याने अशी कामगिरी 2012, 2014, 2016 आणि 2021 मध्ये केली आहे. तर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मागील सामन्यात रविंद्र जडेजा यानेही सर्वाधिक धावा (35) केल्या होत्या. यामुळे तो पण विराटसोबत या यादीत सामविष्ट आहे.
मोठ्या आंतरराष्ट्रीय टी20 स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सर्वोच्च खेळी करणारे खेळाडू
2007 – रॉबिन उथप्पा (टी20 विश्वचषक-50)
2007 – गौतम गंभीर (टी20 विश्वचषक-75)
2012 – विराट कोहली (टी20 विश्वचषक-78*)
2012 – गौतम गंभीर (43)
2012 – युवराज सिंग (72)
2014 – विराट कोहली (टी20 विश्वचषक-36*)
2016 – विराट कोहली (आशिया चषक-49)
2016 – विराट कोहली (टी20 विश्वचषक-55*)
2021 – विराट कोहली (टी20 विश्वचषक-57)
2022 – विराट कोहली आणि रविंद्र जडेजा (आशिया चषक-35)
2022 – विराट कोहली (आशिया चषक-60)
विराटने पाकिस्तान विरुद्ध 9 टी20 सामने खेळले आहेत. तसेच सध्या खेळत असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये टी20मधील पाकिस्तान विरुद्ध त्याचीच सरासरी सर्वाधिक आहे. त्याने 67.66च्या सरासरीने 406 धावा काढल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटच्या इतिहासातील ‘जोडी नंबर वन’ बनले रोहित-राहुल
INDvsPAK: दुसऱ्यांदा बाबरचा डाव स्वस्तात उरकला! यंदा पाकिस्तानविरुद्ध रवी चमकला
लिजेंड्स लीग गाजवायला येतोय ‘युनिव्हर्स बॉस’; सुल्तान सेहवागसह करणार ओपनिंग