आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या संघांमध्ये बुधवारी ( दि.2 नोव्हेंबर) सामना खेळला गेला. या सामन्यात बास डी लीडे याने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. पाकिस्तान विरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला डोळ्याखाली इजा झालेली. अशात नेदरलँड्सचा हा केळाडू दोन दिवसांनंतर दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना देखील झिम्बाब्वेविरुद्ध खेळला.
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात नेदरलँड्स संघाचा खेळाडू बस डी लीडे ( Bas De Leede) डोळ्यांखाली झालेली ही इजा दुर्लक्षित करून मैदानात उतरला. पाकिस्तान विरूद्धच्या मागच्या सामन्यात फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) याचा चेंडू लागून डोळ्यांखाली इजा झालेली. या झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या उजव्या डोळ्याखाली टाके देखील घालण्यात आले. मात्र, डोळ्यांखाली झालेली ही इजा दुर्लक्षित करत तो नेदरलॅँड्स विरूद्ध मैदानात उतरला. एवढच नव्हे तर या सामन्यात त्याने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन देखील केले.
बस डी लीडेने गोलंदाजी करताना त्याच्या 4 षटकात फक्त 14 धावा देत 2 गडी बाद केले. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याला बाउंसर चेंडू लागला होता. याच कारणास्तव त्याला मैदान सोडून जावे लागले. सामना संपल्यानंतर हॅरिस रौफने लीडे याची तब्यतीची विचारणा केली आणि म्हटला की तो पुढच्या सामन्यात पुनरागमन करेल. नेदरलँड्स विरूद्धच्या या सामन्यात असेचं काहीसे बघायला मिळाले.
बुधवारी ( दि.2 नोव्हेंबर) नेदरलँड्स विरूद्ध झिम्बाब्वे यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाच्या पदरी निराशा पडली. पाकिस्तानला एका थरारक सामन्यात पराभूत करणारा झिम्बाब्वे संघ या सामन्यात मात्र केवळ 117 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वे संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. त्यांनी 19.2 षटकात 117 धावा केल्या. झिम्बाब्वेतर्फे सिकंदर रझा ( Sikandar Raza) याने 40 तर सीन विलियम्सन याने 28 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय झिम्बाब्वेच्या कोणत्याही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या करण्यात यश आले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाचा सम्राट बनला ‘किंग कोहली’! लाजवाब खेळीत रचला नवा विश्वविक्रम
राहुलने वाढदिवसापूर्वीच गर्लफ्रेंडला दिले खास गिफ्ट, झळकावली 2022 टी20 विश्वचषकातील पहिली फिफ्टी