आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असून हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद देण्यात आलंय.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सर्व संघांना 25 मे पर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याची परवानगी आहे. त्यानंतर कोणत्याही बदलासाठी आयसीसीच्या इव्हेंट तांत्रिक समितीची मंजुरी आवश्यक असेल.
यंदा टी20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत 9 ठिकाणी एकूण 55 सामने आयोजित केले जातील. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला जाईल.
टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडशी होणार असून 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये हा सामना खेळला जाईल. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असेल.
टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक
5 जून 2024 – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क
9 जून 2024 – भारत विरुद्ध पाकिस्तान. न्यूयॉर्क
12 जून 2024 – भारत विरुद्ध यूएसए, न्यूयॉर्क
15 जून 2024 – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा
महत्त्वाच्या बातम्या –
जोफ्रा आर्चर परतला, ख्रिस वोक्सला संधी नाही; गतविजेत्या इंग्लंडनं जाहीर केला टी20 विश्वचषकासाठी संघ
‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या काय आहे खासियत