कोरोना व्हायरसचा फटका अन्य क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. पण आता यातून हळूहळू मार्ग काढत पुन्हा क्रीडाक्षेत्र सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच केंद्रिय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले होते की देशाने बंद दारामागे स्पर्धा भरवण्यासाठी तयार राहिले पाहिजे.
त्यामुळे बीसीसीआयनेही पुन्हा क्रिकेट सुरु करण्याचा विचार करण्यास सुरुवात केली आहे. भारतात बंगळुरुमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये साधारणत: भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिर होत असते.
पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता हे प्रशिक्षण शिबिर बंगळुरुमध्ये न होण्याची शक्यता दाट आहे. यामुळे आता धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमला या प्रशिक्षक शिबिराचे आयोजन करण्याची संधी निर्माण झाली आहे.
याबद्दल बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी कबूल केले आहे की, जर बंगळुरू जैव सुरक्षेचे वातावरणात प्रदान करण्यास अपयशी ठरले तर बोर्ड पर्यायांचा विचार करीत आहे. २५ मेपासून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा झाल्यानंतरही हा निर्णय आणि पावले उचलली गेली. धुमल हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचेही सदस्य आहेत आणि गरज पडल्यास धरमशालेत शिबिराची व्यवस्था करता येईल, असेही ते म्हणाले आहेत.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार धुमल म्हणाले, ‘ही माझी राज्य संघटना असली तरी मी कधीच हे घडवून आणणार नाही. परंतु पर्यायांचा शोध घेतल्यानंतर बीसीसीआयला असे आढळले की धरमशालेत शिबिर होऊ शकते, मी सर्व व्यवस्था करण्यास तयार आहे. अगदी भारतीय संघ जिथे राहतो ते पॅव्हिलियन हॉटेल हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनची प्रॉपर्टी आहे.’
कोरोना व्हायरसचा विचार करता देशातील बाकी ठिकाणांपेक्षा हिमाचल प्रदेशची परिस्थिती अटोक्यात आहे.
धुमल पुढे म्हणाले, ‘हिमाचलमधील परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास आणि शासकीय प्रोटोकॉलनुसार हा सेफ झोन मानला गेला, तर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन त्याद्वारे जैव-सुरक्षित वातावरण बनविण्यासाठी सर्व काही करेल. हे सर्व कोणता पर्याय उपलब्ध आहे यावर अवलंबून आहे.’
याबरोरच बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी भारतात मान्सुन ऋतू संपल्यानंतर क्रिकेट सुरु होऊ शकते असा इशारा दिला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
‘या’ स्टार भारतीय फलंदाजाच्या नावावर आहे कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम…
विजयासाठी ‘हा’ खेळाडू करायचा मैदानावरच चक्क लघुशंका
धोनी आणि युवराज बाबतीत रोहितने केला धक्कादायक खुलासा म्हणाला. . .