भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ट्विटरने एक धक्का दिला आहे. त्यांचा ट्विटरवरील प्रोफाईल फोटो काढून टाकण्यात आला आहे. याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड समजल्या जाणाऱ्या बीसीसीआयच्या ट्विटरवरील अकाऊंटच्या प्रोफाईलला बीसीसीआय लोगोचा फोटो होता. पण या फोटोवर कॉपीराईटचा आरोप झाल्याने ट्विटरने हा फोटो काढून टाकला आहे. त्यामुळे तिथे सध्या कोणताही फोटो दिसत नाही. पण या अकाऊंटवरील हेडर फोटो मात्र कायम आहे. बीसीसीआयने एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याचा फोटो हेडर फोटो म्हणून लावला होता.
सध्या बीसीसीआयचा प्रोफाईल फोटो काढून टाकण्यात आल्याने अनेक ट्विटरकर्त्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी बीसीसीआयच्या अकाऊंटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. तर काहींनी नक्की काय झाले, असा कोणता फोटो होता, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
New DP of @BCCI 😂😂😂
Account hacked? pic.twitter.com/SIfKcY3f8B— dimaagkoshot (@dimaagkoshot) November 3, 2020
Don't know what happened to bcci dp 🙆♂️🤷♂️@BCCI #bccidp
#MIvsSRH #IPL2020 #Cricket #bcci #viratkholi #RohitSharma #Dhoni #SRHvMI #IPLplayoffs #iplfinal #IPLinUAE #dp #RCB #mi #CSK #SRH #kkr @mipaltan @RCBTweets @ChennaiIPL pic.twitter.com/7o9TjsiQWX— BG Bose (@Balaji4JSP) November 3, 2020
Kya DP tha?
— Chava (@Silly_Point_) November 3, 2020
What was the actual dp
— P R O F E S S O R🍥 (@Kalpaish_) November 3, 2020
@BCCI 's dp😂😂😭😂
— Samaira (@CuteSammy69) November 3, 2020
. @BCCI 's new dp is class pic.twitter.com/gCP9H7dLPc
— Pranav (@being_pranav_) November 3, 2020
बीसीसीआयला ट्विटरवर १२. ८ मिलियन फॉलोवर्स आहेत. या अकाऊंटवरुन बीसीसीआय भारतीय क्रिकेटबद्दल विविध गोष्टी पोस्ट करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ व्यक्तीने अजिंक्य रहाणेला बेंगलोरविरुद्ध पाठवले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला
“पराभूत होऊनही क्वालिफाय होणाऱ्याला RCB म्हणतात “, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवल्यानंतर मीम्स व्हायरल
आयपीएलनंतर आता फाफ डू प्लेसिस करणार ‘या’ मोठ्या स्पर्धेत पदार्पण; पोलार्डची घेणार जागा
ट्रेंडिंग लेख –
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?