भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याने मानसिक आरोग्याच्या कारणामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.
स्टोक्सच्या या निर्णयाबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला समर्थन दिले आहे. नुकतेच इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटनेही याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
जो रुटने त्याचा संघसहकारी असलेल्या बेन स्टोक्सचे समर्थन करत म्हणाला की, स्टोक्सने नेहमी संघाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्याने आता स्वतःला थोडासा वेळ द्यावा. स्टोक्स हा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. इंग्लंड संघात त्याची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे भारत विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याची कमतरता भासेल. परंतु, त्याला आता स्वतःवर लक्ष द्यायचे आहे व त्याला आरामाची गरज आहे. त्याची सध्याची परिस्थिती पाहता क्रिकेट त्यापुढे छोटी गोष्ट आहे.
पुढे रूट म्हणाला की, “जो कोणी स्टोक्सला ओळखतो, त्याला हे चांगलं ठाऊक आहे की, स्टोक्स दुसऱ्यांना स्वतः पेक्षा जास्त महत्त्व देतो. पण सध्या त्याने स्वतःवर लक्ष द्यावे. ‘माझा मित्र व्यवस्थित रहावा एवढेच मला हवे’ त्यामुळे पूर्ण संघ त्याच्या सोबत आहे. त्याला हवा तितका वेळ त्याला मिळावा”.
त्याचबरोबर तो हेही म्हणाला की, ‘संघात स्टोक्सची जागा कोणीच घेऊ शकत नाही. परंतु, मला विश्वास आहे की सॅम करन सारखा युवा खेळाडू या मालिकेत चांगली कामगिरी करेल.’
दरम्यान, इंग्लंडच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यात कोरोना निर्बंधांमुळे खेळाडूंच्या परिवारांना अनुमती मिळणार नसल्याबद्दल बोलताना रूट म्हणाला. “जोपर्यंत याबाबत स्पष्ट तो निर्णय येत नाही, तोपर्यंत खेळाडूंनी किंवा मी कोणताही निर्णय घेणे कठीण आहे. नक्कीच प्रत्येकाला ऍशेस मालिका खेळायची आहे. परंतु, जोपर्यंत याबाबत स्पष्ट निर्णय येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेता येणे कठीण आहे.”
महत्वाच्या बातमी –
–‘पंतप्रधान मोदी कृपाकरून भारतीय संघाचे सामने पाहू नका’, चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी