श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ आपल्या युवा संघासह गेलेला आहे. हा भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. भारताच्या या संघात असे सहा खेळाडू आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी असणार आहे. परंतु, भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारचे असे मत आहे की, या संघातील अनेक खेळाडूंकडे अनुभव नसला तरी कोणतीही अडचण येणार नाही.
भारताचा कसोटी संघ सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने या अगोदर जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळला आहे. तर 4 ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंची निवड केली आहे.
श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय युवा संघांमध्ये देवदत्त पदिक्कल, चेतन सकारिया, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, ऋतुराज गायकवाड आणि वरुण चक्रवर्ती हे असे खेळाडू आहेत, ज्यांना अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. पण या सर्व खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे, ज्यामुळे त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
याचदरम्यान भारतीय मर्यादित षटकांच्या संघाचा प्रभारी उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने स्टार स्पोर्टच्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘आमच्या संघात चांगले खेळाडू आहेत आणि त्यांना आयपीएलचा देखील अनुभव आहे. ते खूप अगोदरपासून टी 20 सामने खेळत आहेत आणि त्यांनी आपल्या संघासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.’
भुवनेश्वर म्हणाला की, ‘ही संघासाठी फायदेशीर परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये सामने खेळून या खेळाडूंना आत्मविश्वास मिळालेला आहे, त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर हे खेळाडू श्रीलंका विरुद्ध सामने खेळणार आहेत. या संघांमध्ये अनुभवी खेळाडू देखील आहेत त्यामुळे हा दौरा उत्कृष्ट होईल असा विश्वास आहे.’
गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामादरम्यान स्नायूंच्या ताणमुळे भुवनेश्वर कुमारला बाहेर जावे लागले होते. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौर्यावरही जाऊ शकला नाही. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले होते.
भुवनेश्वर पुढे म्हणाला की, ‘जेव्हा मी पूर्ण तंदुरुस्त होतो, तेव्हा घरगुती क्रिकेट चालू झाले होते. त्यामुळे माझे लक्ष तंदुरुस्त राहण्यावर आणि परत येण्याकडे जास्त होते. त्यानंतर मी सामन्यांची तयारी देखील सुरू केली.’
भुनेश्वर पुढे म्हणाला की, ‘इंग्लंड विरुद्ध मालिका सुरू होण्याअगोदर मी घरगुती मैदानावर क्रिकेट खेळत होतो. यामुळे मला महत्वाच्या सामन्याचा सराव करण्याची संधी मिळाली. घरगुती क्रिकेट खेळताना एखाद्याने गोष्टी सहज घेऊ नयेत आणि त्यामुळे मला भारताकडून खेळण्याची आणि तंदुरुस्त राहण्याची प्रेरणा देखील मिळते.’
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या मालिकांआधी श्रीलंकेसाठी आली ‘ही’ आनंदाची बातमी