पुणे (2 एप्रिल 2024) – आजचा दुसरा सामना रायगड विरुद्ध लातूर यांच्यात झाला. रायगड संघाने प्ले-ऑफस मधील आपले स्थान निश्चित केले होते त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा सामना जास्त गुणांनी जिंकत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येण्याचा मानस होता. तर लातूर संघाचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले होते. सामन्याच्या सुरुवातीला सामना अत्यंत संथ सुरू होता. 5 मिनिटाच्या खेळानंतर सामना 2-2 असा बरोबरीत होता. त्यानंतर रायगडच्या प्रशांत चव्हाण ने चपळाईने गुण मिळवले. रायगड संघाने 12 व्या मिनिटाला लातूर संघाला ऑल आऊट करत 12-04 अशी आघाडी मिळवली.
प्रशांत जाधव ला अनुराग सिंग ने चांगली साथ देत चढाईत गुण मिळवले. बचवाफळीत विराज पाटील ने उत्कृष्ट पकडी केल्या. रायगड संघाने मध्यंतराला 19-08 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा सुद्धा रायगड संघाने आक्रमकता दाखवत लातूर संघाला ऑल आऊट केले. रायगड कडून प्रशांत जाधव व अनुराग सिंग यांनी सुपर टेन पूर्ण केले.
रायगड संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करत सामना 56-21 असा मोठा विजय मिळवला. रायगड कडून अनुराग सिंग ने चढाईत सर्वाधिक 19 गुण मिळवले. तर प्रशांत जाधव ने चढाईत 11 गुण मिळवले. विराज पाटील ने पकडीत 6 गुण तर वैभव मोरे ने पकडीत 5 गुण मिळवले. लातूर कडून आदित्य भारडे ने सर्वाधिक 9 गुण मिळवले. विजयानंतर रायगड संघ पहिल्या क्रमांकावर आहे. नाशिक संघाला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी आजचा शेवटचा सामना 29 गुणांनी जिंकवा लागेल.
बेस्ट रेडर- अनुराग सिंग, रायगड
बेस्ट डिफेंडर- विराज पाटील, रायगड
कबड्डी का कमाल – अनुराग सिंग, रायगड
महत्त्वाच्या बातम्या-
युवा कबड्डी सिरीजच्या रेलीगेशन मध्ये धुळे संघाचा पाचवा विजय