भारतीय संघाचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याच दरम्यान भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुजारा गेल्या अनेक महिन्यांपासून धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. असे असले तरी आता त्याला भारताचा कर्णधार विराट कोहलीचे समर्थन मिळाले आहे,
चेतेश्वर पुजाराने एकूण 86 सामन्यांत 6267 धावा केल्या आहेत. परंतु, त्याच्यावर अनेकदा खूप संथ गतीने फलंदाजी करण्याचा आरोप झाला आहे. यामुळे त्याच्यासोबत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंवर दबाव वाढतो. पुजाराबद्दल विचारले असता कोहलीने म्हटले की, ‘याविषयी काही काळ चर्चा झाली आहे आणि मला प्रामाणिक असे वाटते की अशाप्रकारची प्रतिभा आणि अनुभव असलेल्या खेळाडूला खेळातल्या कमजोरी शोधण्यासाठी एकटे सोडून द्यावे.’
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीआधी पत्रकारांशी बोलताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ‘या टप्प्यावर खेळाडूंना त्यांच्या जबाबदाऱ्या माहीत आहेत आणि अनावश्यक टीका त्यांना त्रास देत नाही, किमान पुजाराला तर नाही. त्याचप्रमाणे माझ्यासाठी किंवा या संघातील इतर कोणत्याही खेळाडूला, आम्ही संघासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे, त्याबद्दल आम्ही खूप जागरूक आहोत. मी बाहेरून असे म्हणू शकतो की टीका अनावश्यक आहे, परंतु मला हे माहित आहे की पुजाराला त्याची पर्वा नाही आणि अशी टीका तुम्हाला पाहिजे तितकी संबंधित ठेवता येते.’
भारत आणि इंग्लंड संघात पहिली कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पहिला सामना नॉटिंघम येथे खेळवला जाणार आहे. भारताने पहिल्या कसोटीसाठी अंतिम 11 खेळाडूंची अजूनही घोषणा केलेली नाही. पण या संघात केएल राहुलला सलामीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण मंयक अगरवाल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सेहवागने ट्विटरवर शेअर केला चक्क ‘फोन नंबर’, चाहतेही झाले चकीत
‘हा’ भारतीय खेळाडू ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यात ‘हुकुमी एक्का’, ऑसी दिग्गजाचा दावा