इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघ स्पर्धेसाठी जोरदार तयारी करीत आहेत. त्याशिवाय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनुभवी क्रिकेटपटू आयपीएल संघातील प्लेइंग इलेव्हनची निवड करत आहेत.
नुकतेच, माजी क्रिकेटपटू आणि आकाश चोप्राने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली. आता त्याने केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.
आश्चर्यकारक निर्णय घेत आकाश चोपडाने जगातील सर्वात धोकादायक टी20 फलंदाज ख्रिस गेलची निवड केली नाही. हा धक्कादायक निर्णय आहे कारण गेल एक अतिशय स्फोटक फलंदाज असून आयपीएलमधील सर्वोत्तम डाव (175 धावा) खेळला आहे.
इतकेच नाही तर टी20 प्रकारात गेलकडे 1000 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करण्याची उत्तम संधी आहे. हा असा विक्रम आहे जो कदाचित कोणीही मोडू शकणार नाही. आयपीएलमध्येही सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे.
आयपीएलमध्ये 326 षटकार ठोकणार्या गेलने टी20 प्रकारात एकूण 978 षटकार ठोकले आहेत आणि आयपीएलच्या आगामी हंगामात त्याने आणखी 22 षटकार ठोकले तर त्याच्या नावावर 1000 टी20 षटकार असेल.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या संघात आकाशने कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवालची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसर्या क्रमांकावर त्याने दोन खेळाडूंची निवड केली. यात करुण नायर आणि मनदीप सिंग यांची नावे आहेत.
मधल्या फळीत आकाशने निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सर्फराज खान यांची निवड केली. खालच्या क्रमांकावर कृष्णप्पा गौथम आणि ख्रिस जॉर्डन यांचा समावेश आहे.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जॉर्डन व्यतिरिक्त मोहम्मद शमी संघात असेल. मुजीब उर रहमान आणि रवी बिश्नोई हे फिरकी गोलंदाज असेल.
आकाश चोपडाने निवडलेला संभाव्य किंग्ज इलेव्हन पंजाब संघ- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, करुण नायर / मनदीप सिंग, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, कृष्णप्पा गौथम, ख्रिस जॉर्डन, मुजीब उर रहमान, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी.
आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ 20 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळला जाईल.
लीग फेरीदरम्यान सर्व संघ एकमेकांविरूद्ध दोन सामने खेळतील. त्यामुळे एक संघ एकूण 14 सामने खेळेल.
किंग्ज इलेव्हन पंजाबची संपूर्ण टीम- केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, मुजीब जादरान, शेल्डन कॉटरल, हरदास विल्जॉयन, दर्शन नलकांडे, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, मनदीप सिंग, सरफराज खान, के गौतम, जे सुचित, रवी बिश्नोई, दीपक हुडडा, तजिंदर ढिल्लों, प्रभसीमरण सिंग आणि मुरुगन अश्विन.