भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने देशांतर्गत क्रिकेटमधील बडोदा संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बडोदा संघाचे प्रदर्शन खूपच खराब राहिले होते. त्यानंतर कृणाल पांड्याने संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कृणालने बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव अमीन यांना ईमेल करून ही माहिती दिली आहे. वृत्तानुसार असेही समजते आहे की, निवडकर्त्यांसोबत वाद झाल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. कृणालनंतर आता संघ नवीन कर्णधाराच्या शोधात असणार आहे.
दरम्यान, यावर्षी कृणाल पांड्या आणि वेगवान गोलंदाज दीपक हुड्डा यांच्यात देखील वाद झाला होता. या वादानंतर हुड्डाने बडोदा संघाची साथ सोडली होती आणि राजस्थान संघामध्ये सामील झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडक करताना पक्षपात झाल्याचे आरोप यावेळी केले गेले होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्यामुळे हुड्डा खूपच हैराण झाला होता आणि निवडकर्त्यांसोबत त्याचा याच कारणास्तव वाद झाला होता.
कृणाल पांड्याने यामागच्या दोन हंगामापासून बडोदा संघाचे नेतृत्व स्वीकारले होते, पण जेव्हापासून त्याने ही जबाबदारी स्वीकारली आहे, तेव्हापासून तो सतत विवादात दिसला आहे. मागच्या वर्षी दिपक हुड्डाने बडोदा क्रिकेटला ईमेल करून कर्णधार कृणाल पंड्याविषयी तक्रार केली होती. त्याने या ईमेलमध्ये कृणाल त्यांच्याविषयी अपशब्द वापरत असल्याचे सांगितले होते.
दीपक हुड्डा यापूर्वी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी खेळला आहे. हुड्डाने या मेलमध्ये लिहिले होते की, यावेळी मी निराश, उदास आणि दबावात आहे. मागच्या काही दिवसांपासून माझ्या संघाचा कर्णधार कृणाल पंड्या संघातील सहकारी खेळाडू आणि इतर राज्यांच्या संघांसमोर माझ्यासाठी अभद्र भाषा वापरत आहे.
अशी माहिती मिळत आहे की, कृणाला पंड्याने बडोदा संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर केदार देवधरकडे ही जबाबदारी येऊ शकते. कृणालाने संघाचे नेतृत्व सोडण्यामागे मागच्या वर्षी हुड्डाने केलेल्या तक्रार देखील कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“झहीरला पाहून कर्णधार होण्याची प्रेरणा मिळाली”; कमिन्सने केला खुलासा