आगामी 19 सप्टेंबरपासून बांग्लादेश संघ भारताचा दाैरा करणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघात 2 कसोटी तर 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेशने शेवटच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. बीसीसीआयने बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा अधीच केली आहे. तर आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
वास्तविक, बांग्लादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. शाकिब सध्या त्याच्यावरील खुनाच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. तो बांग्लादेशच्या पाकिस्तान दौऱ्यातही संघाचा भाग होता. त्यावेळी त्याच्यावर हत्येत सहभागी असल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (12 सप्टेंबर) भारताविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. नजमुल हुसेन शांतोला पुन्हा एकदा कर्णधार बनवण्यात आले आहे. यापूर्वी, शांतोच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशने पाकिस्तानचा त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता.
हत्येच्या आरोपांमुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड शाकीब अल हसनचा भारत दौऱ्यासाठी विचार करणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. परंतु तसे झाले नाही. त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
Bangladesh Test Squad for the India Tour 2024#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #INDvsBAN pic.twitter.com/1npeXGgkix
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 12, 2024
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ- नजमुल शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन, जेकर अली, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, तैजुल, हसन जॉय, नईम हसन, खालेद अहमद
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
कसोटी सामन्याचे वेळापत्रक
भारत विरुद्ध बांग्लादेश, पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर)
भारत विरुद्ध बांग्लादेश, दुसरा कसोटी सामना (27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर)
हेही वाचा-
काय सांगता! एकाच संघाकडून खेळणार विराट कोहली अन् बाबर आझम? या स्पर्धेत जुळतील योग
टीम इंडियातील पुनरागमन लांबलं! दुलीप ट्रॉफीत ऋतुराज गंभीर जखमी
147 वर्षांचा इतिहास बदलण्यासाठी कोहली सज्ज, लवकरच तुटणार सचिन तेंडुलकरचा हा विक्रम