इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपल्यानंतर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा हिने मैदानावर येत सर्वांपुढे पत्नीच्या पायांना स्पर्श केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रिवाबा जेव्हा जडेजाच्या पाया पडते, तेव्हा सीएसके संघाचा अष्टपैलू पत्नीची गळाभेट घेतो. रिवाबाचे सर्वत्र खूपच कौतुक केले जात आहे. मात्र, अशातच चेन्नई सुपर किंग्स संघाचा 26 वर्षीय स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याची होणारी पत्नी उत्कर्षा पवार हिचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत म्हटले जात आहे की, सीएसकेने ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर येत उत्कर्षाने एमएस धोनीच्या पायांना स्पर्श केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचे खेळाडू पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आपले कुटुंब आणि खेळाडूंसोबत मैदानावर जल्लोष करत आहेत. या सर्वांमध्ये महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हादेखील उभा आहे. सहकारी आणि इतर लोक धोनीला विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) तिथे येते. उत्कर्षाला पाहून धोनी तिची गळाभेट घेतो, त्यानंतर ती माहीच्या पायांना स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घेते.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याची होणारी पत्नी उत्कर्षाने धोनीबद्दल आदर व्यक्त करून सर्वांची मने जिंकली आहेत. चाहते उत्कर्षाचं भरभरून कौतुक करत आहेत. खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला 5 विकेट्सने पराभूत करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली.
Utkarsha (Mrs. Rutu) taking blessing of Dhoni ????❤️????. So Cute and Adorable???????????? pic.twitter.com/o5xH5RHMew
— Sai Vamshi Patlolla (@sai_vamshi21) June 1, 2023
माध्यमांतील वृत्तांनुसार, ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार (Ruturaj Gaikwad And Utkarsha Pawar) यांचे लग्न 3 जून रोजी होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या मेहंदी समारंभाचेही अनेक फोटो व्हायरल होत आहेत. खरं तर, उत्कर्षाही एक क्रिकेटर आहे, जी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करते. तिने तिचा शेवटचा सामना नोव्हेंबर 2021मध्ये खेळला होता. सध्या ती पुण्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (INFS), येथे शिकत आहे.
खरं तर, ऋतुराजला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून संघात सामील केले होते. मात्र, त्याच्या लग्नामुळे तो संघातून बाहेर पडला. त्याच्या जागी यशस्वी जयसवाल याला संधी मिळाली. डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या के ओव्हल मैदानात पार पडणार आहे.
ऋतुराजची आयपीएल 2023 हंगामातील कामगिरी
ऋतुराजसाठी आयपीएल 2023 हंगाम शानदार ठरला. त्याने 16 सामन्यात फलंदाजी करताना 42.14च्या सरासरीने आणि 147.50च्या स्ट्राईक रेटने 590 धावांचा पाऊस पाडला. तो या हंगामात सर्वाधिक धावा करणारा सातवा खेळाडू ठरला. (cricketer ruturaj gaikwad fiance utkarsha pawar touches ms dhoni feet after csk won ipl 2023 title see heartwarming video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रूटने कसोटीत रचला इतिहास! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज, विराट तर लईच लांब
मोठी बातमी! महिला आशिया चषकासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा, विश्वचषक गाजवणाऱ्या रणरागिनीकडे नेतृत्व