नवी दिल्ली। ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एक महान कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या रिकी पाँटिंगने नुकतेच मंकडींगबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याने सांगितले होते की, तो यावर्षी फिरकी गोलंदाज आर अश्विनशी काटेकोरपणे वागेल आणि मंकडींग न करण्यास सांगेल. तरीही, आता पाँटिंगने आपल्या विधानावरून यूटर्न घेतला आणि अश्विनच्या मताशी सहमती दर्शविली आहे.
धावा चोरण्याच्या प्रयत्नात चेंडू फेकण्यापूर्वीच नॉन स्ट्राईक वर असलेला फलंदाज समोर आला, तर ५ धावांचा दंड व्हायला हवा, असे अश्विन चे मत होते.
उल्लेखनीय बाब आहे की पाँटिंग हा आयसीसीच्या नियमाचा एक मोठा टीकाकार होता. माजी अष्टपैलू खेळाडू विनू मंकड यांच्या नावावर मंकडींग हे नाव ठेवण्यात आले आहे. जेव्हा पाँटिंगला विचारले गेले की जर गोलंदाज मंकडींग करत नसेल आणि फलंदाज क्रीज मधून बाहेर पडण्यास इच्छुक असेल तर काय करावे? पाँटिंगने या प्रश्नावर अश्विनला पाठिंबा दर्शविला.
फलंदाजाला धावांचा दंड ठोठवायला हवा
यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अश्विनने पाँटिंगला विचारले की, टी२० सामन्यात नो बॉल वर बारीक नजर ठेवली जाते. टी२० मध्ये प्रत्येक चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज पार केल्यावर फलंदाजालासुद्धा अशाच प्रकारे शिक्षा व्हायला हवी का??
तो म्हणाला, “मला असे वाटते धावांचा दंड आकारला जावा. जेव्हा आपण गोलंदाजीला येत असता आणि थांबता तेव्हा असे दिसते की फलंदाज फसवणूक करीत आहे, तो क्रीजच्या बाहेर आहे, मला वाटते एका धावेचा दंड आकारण्यात यावा. हे सुरुवातीपासूनच करा ज्यामुळे ते असे करणार नाही. संघाच्या एकूण धावसंख्येमधून 10 धावा कमी केल्याची कल्पना करा कारण आपण क्रीझबाहेर जात आहात. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.”
अश्विनने बटलरला मंकडींगने केले होते बाद
अश्विनने आयपीएलच्या मागील हंगामात इंग्लंडच्या जॉस बटलरला क्रीजमधून बाहेर आल्यावर धावबाद केले होते. तेव्हा त्याच्यावर टीका केली गेली होती आणि बर्याच लोकांनी त्याला खिलाडूवृत्तीच्या विरूद्ध असल्याचे म्हटले होते. अश्विनने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले की तो फलंदाजांच्या क्रीजचा फायदा उचलण्याच्या विरोधात आहे.
ज्युनियर क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून सुरुवात केलेल्या अश्विनने पॉंटिंगला सांगितले की, “मला वाटते की ही एक अतिशय फायद्याची गोष्ट आहे (फलंदाजासाठी).”
फलंदाजाला फसवणूकीचा प्रयत्न करण्यापासून थांबविले पाहिजे
दोनदा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार असलेला रिकी पाँटिंग यावर म्हणाला, “तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करीत आहात हे मला पूर्णपणे समजले आहे आणि मी तेच बोललो होतो. मी असे म्हणण्याचा प्रयत्न करीत नाही की आपण योग्य होता कारण आपण सामन्यादरम्यान हे करू शकत नाही. जर फलंदाजाने फसवणूक केली आणि काही यार्ड हलण्याचा प्रयत्न केला तर प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर फलंदाजाला फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या प्रशिक्षकाच्या कृत्यामुळे वसीम अक्रमची आगपाखड
-सीपीएलमध्ये जेसन होल्डरच्या संघाची नवीन उल हक पुढे सपशेल शरणागती
-मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल ‘या’ ११ खेळांडूसोबत
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!
-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज