कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या दिवशी गतविजेत्या फ्रान्सने विजय मिळवला. फ्रान्सने पोलंडचा 3-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की केली. युवा स्ट्रायकर किलीयन एम्बाप्पे याने दोन गोल झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Cruising to the Quarter-Finals 🔵
The reigning champs are looking like they mean business 🔥 pic.twitter.com/bEySE5inJA
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022
अल थुमामा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन मातब्बर खेळाडू आमने-सामने होते. पोलंडसाठी कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्की व फ्रान्ससाठी किलीयन एम्बाप्पे कसे खेळतात याकडे सर्वांचे लक्ष होते. सुरुवातीपासून सामन्यावर आपला कब्जा करत फ्रान्सने एकापाठोपाठ एक आक्रमणे केली. मात्र, त्यांना यश लाभत नव्हते. पहिल्या हाफच्या अखेरीस एम्बाप्पेच्या पासवर जिरू याने गोल झळकावला. यासह तो फुटबॉल इतिहासात फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनला.
एका गोलच्या आघाडीने दुसऱ्या हाफमध्ये खेळण्यासाठी उतरलेल्या फ्रान्स संघासाठी एम्बाप्पेने धडाकेबाज खेळ केला. 74 व्या मिनिटाला गोल करत त्याने आघाडी दुप्पट केली. त्यानंतर इंजुरी टाईममध्ये देखील त्याने गोल मारत पराभूत होणार नाही याची निश्चिती केली. सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना पोलंडसाठी रॉबर्ट लेवांडोस्कीने गोल करत चाहत्यांना उत्साहित केले. मात्र, त्याचा सामन्याच्या निकालावर काहीही परिणाम झाला नाही.
(FIFA WORLD CUP France Beat Polland In Pre QF)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या तीन कारणांनी अडले टीम इंडियाचे घोडे! बांगलादेशने दिली न भरून येणारी जखम
ढाकाच्या मैदानावर शाकिबचा इतिहास, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना पाडले मागे