मागील 22 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू असलेली फीफा विश्वचषक 2022 स्पर्धा संपुष्टात आली. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघात खेळला गेला. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाने हा विश्वचषक आपल्या नावे केला. या स्पर्धेत खास कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. त्यापैकीच एक ‘गोल्डन बॉल’ होय. यंदा मेस्सीलाचा पुरस्कार देण्यात आला. मात्र, हा बॉल कुणाला आणि केव्हापासून देण्यात येतो, याबाबत अनेक फुटबॉलप्रेमींना माहिती नसेल. चला तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
⭐️ MESSI ⭐️
Our @adidas Golden Ball Award winner!#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
प्रत्येक फिफा विश्वचषक (Fifa World Cup) स्पर्धेचा शेवट हा स्पर्धेदरम्यान स्वतःला वेगळे सिद्ध केलेल्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या निवडीसह होतो. या पुरस्कारांपैकी सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘गोल्डन बूट’ (स्पर्धेत सर्वोत्तम गोल करणाऱ्या खेळाडूला दिले जाते), ‘गोल्डन ग्लोव्हज’ (सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या गोलकीपरला दिले जाते) आणि ‘गोल्डन बॉल’ (सर्वोत्तम खेळाडूला दिला जातो) यांचा समावेश आहे.
कधीपासून दिला जातोय ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार?
फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला ‘गोल्डन बॉल’ (Golden Ball) दिला जातो. हा पुरस्कार 1982 या सालापासून दिला जात आहे. आतापर्यंत या पुरस्कारावर 10 खेळाडूंनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन वेळा हा पुरस्कार आपल्या नावे करणारा मेस्सी एकमेव खेळाडू ठरला.
फिफाच्या तांत्रिक समितीद्वारे खेळाडूंची एक शॉर्टलिस्ट तयार केली जाते. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींच्या निवडीद्वारे त्यावर मतदान केले जाते. विजेत्या संघात नसलेले खेळाडूही या पुरस्कारासाठी पात्र असतात. आतापर्यंत इटली, अर्जेंटिना आणि ब्राझील या देशांच्या खेळाडूंनी प्रत्येकी 2 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. यांच्यासह एकूण 10 खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकला आहे. आतापर्यंत फक्त एका गोलकीपरने हा पुरस्कार जिंकला आहे. तो खेळाडू म्हणजेच ऑलिव्हर कान (Oliver Kahn) होय. त्याने 2002 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. (FIFA World Cup Golden Ball: Know all winners know the complete list here)
‘गोल्डन बॉल’ विजेते आणि स्पर्धेचे ठिकाण (Golden Ball And Tournament Place)
पाउलो रॉसी (इटली), ठिकाण- स्पेन (1982)
दिएगो मॅराडोना (अर्जेंटिना), ठिकाण- मेक्सिको (1986)
साल्वाटोर शिलाची (इटली), इटली (1990)
रोमॅरियो (ब्राझील), ठिकाण- यूएसए (1994)
रोनाल्डो (ब्राझील), ठिकाण- फ्रान्स (1998)
ऑलिव्हर कान (जर्मनी), ठिकाण- रिपल्बिक ऑफ कोरिया/जपान (2002)
झिनेदिन झिदान (फ्रान्स), ठिकाण- जर्मनी (2006)
डिएगो फोर्लन (URU), ठिकाण- दक्षिण आफ्रिका (2010)
लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना), ठिकाण- ब्राझील (2014)
लुका मॉड्रिच (क्रोएशिया), ठिकाण- रशिया (2018)
लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना), ठिकाण- कतार (2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकात फीफा वाटणार तब्बल 3641 कोटी, विजेत्या संघासोबत इतर टीमवरही पडणार पैशांचा पाऊस
FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात