मुंबई । जगात फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. पेले, माराडोना, लियोनल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे सर्व खेळाडूंना फॅन्सं देव मानून भक्ती करतात. खेळाडू देखील आपले सर्वोत्कृष्ट प्रर्दशन व्हावे, यासाठी प्रचंड मेहनत घेतात. या यशासाठी काही टोटक्यांचा देखील आधार घेताना पाहायला मिळतात. आज आपण अशा चार खेळाडूंची माहिती घेणार आहोत जे विजयासाठी प्रयत्नांबरोबर काही अंधश्रद्धावर विश्वास ठेवून टोटके वापरायचे.
सर्जियो गोयोचेया
फुटबॉलमध्ये गोलकिपरला वेडे समजले जाते आणि या यादीमध्ये अर्जेन्टिनाचा माजी गोलकीपर सर्जिओ गोयोचेया टॉपवर होता. गोयोचेया सामना जिंकण्यासाठी असे टोटके वापराचा ते वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. गोयोचेया प्रत्येक पेनल्टी शूटआऊटच्या अगोदर फुटबॉल मैदानावर लघुशंका करायचा, असे केल्याने त्याचे स्टार चमकतात आणि संघाला विजय मिळतो असे तो मानायचा. 1990 च्या फीफा वर्ल्डकपमध्ये त्याने असेच केले होते आणि सेमीफायनलच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला होता. अंतिम सामन्यात मात्र वेस्ट जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव केला.
50 टोटके करायचा जॉन टेरी
इंग्लंडचा पूर्व फुटबॉल कर्णधार जॉन टेरी हा तर टोटक्यांचा बादशाह मानला जायचा. जॉन ने मुलाखतीत सांगितले की, सामन्याच्या अाधी एक-दोन नाही तर पन्नास टोटके करायचा. सामन्याअाधी तो आपल्या आवडत्या गायकाची गाणी ऐकायचा. त्याचबरोबर त्याची गाडी तो नेहमी त्याच ठिकाणी उभे करायचा जी जागा त्याच्यासाठी लकी होती. टेरी नेहमी बसमध्ये त्याच्या लकी सीटवर बसायचा. टेरीने त्याची लकी शीन पॅड तब्बल दहा वर्ष वापरला.
अंधश्रद्धेने घेतला एका खेळाडूचा जीव
फुटबॉलचा सामना संपल्यानंतर संघातील सर्वच खेळाडू एकसाथ अंघोळ करताना अनेकदा पाहिले असेल, पण झिम्बाब्वेमधील मिडलाँड पोर्टलाँड सिमेंट या फुटबॉल क्लब
च्या प्रशिक्षकाच्या अंधश्रद्धेमुळे एका खेळाडूला जीव गनवावा लागला. क्लबचे प्रशिक्षक आपल्या संघातील खेळाडूंना शुद्ध करण्यासाठी जामबेजी नदीवर घेऊन गेले. नदीमध्ये एकूण सोळा खेळाडूंनी सूर मारला पण त्यातील पंधराच खेळाडू नदीतून पोहून बाहेर आले. एक खेळाडू मात्र नदीत वाहून गेला.
टक्कल वर करायचा कीस
लॉरेंट ब्लँक हा फेबियन बर्थेज च्या टकल्यावर किस करसयचा. किस करतानाचा हा फोटो 1998 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये प्रचंड गाजला होता. फ्रान्सचे हे दोन खेळाडू प्रत्येक सामन्याच्या पूर्वी असेच करायचे. याचबरोबर फ्रान्सच्या संघातील प्रत्येक खेळाडू प्रत्येक सामन्यात एकाच सीटवर बसायचे ते कधीच आपले स्थान बदलत नसे. स्टेडियममध्ये येताना देखील एकच गाणे ऐकायचे.