गोवा: सहा वर्षापूर्वी आपले पहिले जेतेपद मिळवल्यानंतर गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली.त्याचा नेव्हीगेटर मुसा शेरीफसह त्याने सहा एपीआरसी आणि महिंद्रा ऍडव्हेंचर रेसमध्ये छाप पाडल्यानंतर या जोडीने 15 विशेष स्तरात देखील आपली चमक दाखवली.
रॅलीतील शेवटच्या विशेष स्तरातील एसएस12 मध्ये युवा कुमार पिछाडीवर पडल्याने विनय प्रसादने आघाडी घेतली.युवा या गटात सुरुवातीला आघाडी होता.15 किमी शिल्लक असताना त्याच्या बाईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याला 15 मिनिटांचा फटका बसला व जेतेपद गमवावे लागले.
गिलचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्ती) यांनी दुसरे स्थान मिळवले तर,मारूती सुझुकीच्या सम्राट यादव ( करण उकतासह) याने तिसरे स्थान पटकावले. गिल व मुसा यांनी दक्षिण डेयर मध्ये चमक दाखवली. त्यांची एकत्रितपणे 50 रॅली केल्या असून त्यापैकी 31 रॅलीमध्ये विजय मिळवला. यासोबत 35 वेळा ते पोडीयममध्ये आले आहेत.त्यापैकीच फक्त 15 वेळा ते तांत्रिक बिघाडमुळे फक्त त्यांची संधी हुकली.
रॅलीसाठी मी आपला हाच उत्साह कायम ठेवला आहे.ड्राईव्हच्या वेळी आम्ही 200 टक्के योगदान देत असतो. असे गिल टीम चॅम्पियनशिप ट्रॉफी स्वीकारताना म्हणाला. आम्ही संघ म्हणून गेल्या पाच दिवसात चमक दाखवली. असे तो पुढे म्हणाला.गिलने 06:57:44 वेळेसह पाच स्तर पूर्ण केले.इतरांपेक्षा 15 मिनिटे च्या फरकाने बाजी मारली. रॅलीच्या लांब पल्ल्यासाठी त्याने सर्वाधिक
01:15:50 मिनिटे वेळ नोंदवली.टीम मारुती सुझुकीने सर्वच विभागात चमक दाखवली.संदीप शर्मा आणि सुरेश राणा यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवले.
– कार
1) गौरव गिल/ मुसा शरीफ – 6:57:44
2) फिलिपोस मथाईस/ पीव्हीएस मुर्थी – 7:12:00
3) सम्राट1 यादव/ करण उकटा – 7:21:10
…………
बाईक
1) विनय प्रसाद – 6:10:07
2) विश्वास एस. डी – 6:10:09
3) युवा कुमार – 6:13:49
…………
एमएसडीडी 2018 कार ओपन
1) प्रमोद विग/ प्रकाश एम
2) रघुनंदन/ साकेतेवेल
3) संतोष / नागा
……………
एमएसडीडी 2018 एसयूव्ही ओपन
1) विनय कुमार/ रवी कुमार
……..
एएसडीडी 2018 डे कार – ओई
1) श्रीकांत/ रघुरमन
2) नंदीथा रेड्डी/ संजना रेड्डी
………..
एएसडीडी 2018 डे एसयुव्ही -ओई
1) फिलिप बकलीन/ डेव्हिड शेरॉन
2) दीपक सचदेवा/ जपज्योत सिंग
………..
एमएसडीडी 2018 डे कपल
1) कॅप्टन अभिलाशा सिंग/ शैलेंद्र सिंग
2) अनिल अब्बास / सिनी अनिल
3) स्निग्धा केमकर/ भालचंद्र
………
एमएसडीडी 2018 डे लेडीस
1) गीता वाधवा / प्रतिभा