आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यावर्षीचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे, पण मादेशात ऑस्ट्रेलिया चांगले प्रदर्शन करू शकले, याविषयी खात्री देता येणार नाही. ऑस्ट्रेलियाने नुकतीच मायदेशात इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका गमावली. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यातील टी-20 मालिकाही गमावली होती. त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा असेलला ग्लेन मॅक्सवेल देखील सध्या खराब फॉर्मचा सामना करताना दिसतोय. अशात टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियासाठी नक्कीच सोपा नसेल.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) टी-20 क्रिकेटमध्ये नेहमीच त्याच्या पावर हिटिंगसाठी ओळखला जातो. त्याने आंतरराष्ट्रीय आणि टी-20 लीगमध्ये स्वतःची प्रतिभा यापूर्वी अनेकदा दाखवली आहे. मात्र, मागच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. प्रामुख्याने भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकांमध्ये त्याने चाहत्यांची चांगलीच निराशा केली. मागच्या सहा टी-20 सामन्यांमध्ये त्याने एकदाही दोन आकडी धावसंख्या केली नाहीये. त्याने या सहा सामन्यांमध्ये 8, 1, 0, 6, 0 आणि 1 अशा इनिंग्ज पार पाडल्या आहेत. या सहा डावांमध्ये त्याने एकूण 33 चेंडू खेळले आणि 2 पेक्षा कमी सरासरीने 16 धावा केल्या.
मॅक्सवेलची ही आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियन संघासाठी त्याचा फॉर्म सर्वात मोठी चिंता ठरू शकते. परिस्थिती जर अशीच राहिली, तर पुढच्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला त्यांचे विजेतेपद टिकवून ठेवता येणार नाही. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला त्यांचा पहिला सामना 22 ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये मध्ये प्रतिस्पर्धी न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेचा विचार केला, तर मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (12 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाने 8 धावांनी गमावला. त्याआधी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने त्यांना 8 धावांनीच पराभूत केले होते. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
महिला आशिया चषकाच्या इतिहासात भारत सलग 8व्यांदा अंतिम फेरीत, थायलंडचा दारूण पराभव
T20 World Cup: बंगळुरू ते ऑस्ट्रेलिया, मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती