दुलीप ट्रॉफी 2023 चे विजेतेपद हनुमा विहारी याच्या नेतृत्वातील दक्षिण विभागन संघाने जिंकले. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर पश्चिम विभागाचे मोठे आव्हान होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी (16 जुलै) पहिल्याच सत्रात दक्षिण विभागाने 75 धावांनी विजय साकारून विजेतेपद पटकावले. पश्चिम विभागाला विजयासाठी शेवटच्या डावात 298 धावा हव्या होत्या. मात्र, त्यांचा संघ 84.2 षटकात 222 धावांवर गुंडाळला गेला. यानंतर बोलताना विजेत्या संघाचा कर्णधार हनुमा विहारी याने मोठे वक्तव्य केले.
पहिल्या चार दिवस अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पश्चिम विभागाला अखेरच्या दिवशी 116 धावांची गरज होती. तर, दक्षिण विभागाला पाच बळी घेणे गरजेचे होते. अशाच दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना 41 धावांमध्ये उर्वरित पाच बळी टिपत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर बोलताना विहारी म्हणाला,
“मी या संपूर्ण स्पर्धेत नेतृत्व करण्याचा आनंद लुटला. ज्यावेळी तुमच्याकडे इतकी प्रतिभा असलेले खेळाडू असतात त्यावेळी नेतृत्व करणे काहीसे सोपे जाते. विरोधी संघाला जास्त धावा काढून देण्याचे आमचे लक्ष आमच्या गोलंदाजांनी ही रणनीती योग्यपणे अंमलात आणली.”
त्याने या अंतिम सामन्यात खेळलेल्या कर्नाटकच्या तीनही वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला
“विद्वत कवीरप्पा, विजयकुमार वैशाक व वासूकी कौशिक यांनी आपल्या घरच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत शानदार गोलंदाजी केली. असे गोलंदाज कर्णधारांचे काम सोपे करत असतात.”
सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला हनुमा स्वतः देखील या सामन्यात चमकला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात 63 तर दुसऱ्या डावात 42 धावा केल्या.
(Hanuma Vihari Spokes After Winning Duleep Trophy For South Zone)
महत्वाच्या बातम्या –
‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल
खूपच कमी वयात आफ्रिदीची कसोटीत मोठी कामगिरी, श्रीलंकेच्या सलामीवीराची विकेट घेताच रचला विक्रम; पाहा व्हिडिओ