भारताने नव्या वर्षाची सुरूवात विजयाने केली आहे. संघाने मंगळवारी (3 जानेवारी) श्रीलंकेचा पहिल्या टी20 सामन्यात 2 धावांनी पराभव केला. यामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यातील शेवटचे षटक चांगलेच चर्चेत राहिले. यामध्ये श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती. तेव्हा भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने विचित्र निर्णय घेतला. त्याने हे षटक अक्षर पटेल याच्या टाकायला सांगितले. त्याने असे का केले याचे कारण पुढे आले आहे.
श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये म्हणाला, “मी या संघाला कठीण परिस्थितीत टाकू इच्छितो ज्यामुळे पुढे येणाऱ्या महत्वाच्या सामन्यात आम्ही दबावात येणार नाही. आम्हाला या मालिकेत चांगली कामगिरी करायची आहे आणि स्वत: ला आव्हान देणे चांगला निर्णय ठरला. या सामन्यात युवा खेळाडूंनी संघाला विजय मिळवून दिला आहे.” त्याच्या या वक्तव्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या सामन्यात अक्षरने शेवटच्या षटकात 10 धावा दिल्या आणि हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. हार्दिकने पदार्पण करणाऱ्या शिवम मावी याचेही कौतुक केले आहे. त्याने म्हटले, “आयपीएलच्या दरम्यान मी त्याच्याशी बोललो आहे. मी त्याला म्हटले स्वत: वर विश्वास ठेव आणि चांगली गोलंदाजी कर, चिंता करू नको.” पदार्पणाच्या सामन्यात मावीने 4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तो पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तिसराच भारतीय गोलंदाज ठरला.
सामन्यादरम्यान हार्दिकला झेल पकडताना क्रॅम्पही आला होता. त्यावरही तो म्हणाला, “माझी पुरेशी झोप झाली नव्हती आणि मी पाणीही कमी पिले होते, यामुळे तसे झाले. घाबरण्याचे काहीही कारण नसून मी हसत आहे याचा अर्थ सर्वकाही ठिक आहे.”
Surprised to see Axar bowling the final over? Here's Captain @hardikpandya7 revealing the reason behind the move. #INDvSL #TeamIndia @mastercardindia pic.twitter.com/dewHMr93Yi
— BCCI (@BCCI) January 3, 2023
यावेळी मावीबरोबर उमरान मलिक यानेही प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने या सामन्यातील सर्वात वेगवान 155 किमी प्रतितास वेगाने चेंडूही टाकला. या मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला पुण्यात खेळला जाणार आहे.
(Hardik Pandya explained the reason behind giving the last over to Axar Patel)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: उमरानच्या रॉकेटगतीने बुमराहचा विक्रम मोडीत, श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करत फिरवला सामना
15 वर्षीय मानस धामणेची पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत कडवी झुंज