भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांची मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेमध्ये विस्फोटक भारतीय फलंदाज हार्दिक पंड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्व क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली आहे. तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत पंड्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते. त्याच्या या कामगिरीने दिग्गज भारतीय कर्णधार कपिल देव यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. कपिल देव यांनी हार्दिक बद्दल बोलताना त्याने टी२० मध्ये कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी हे सांगितले आहे.
ते म्हणाले की, “पंड्याने टी२० मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. पंड्याने आपल्या फलंदाजीत इतर फलंदाजांच्या तुलनेत अधिक सुधारणा केली आहे. संघाला २-३ खेळाडू असे हवे असतात जे मधल्या षटकात आक्रमक फलंदाजी करू शकतील. पंड्या नंबर ४ वर उत्तम फलंदाजी करू शकतो.”
टी२० क्रिकेट मध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात यावी
कपिल देव यांच्या मते, “भारतीय संघाने टी२० क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना जास्त संधी द्यावी. टी२० क्रिकेट हा युवा खेळाडूंचा क्रिकेट प्रकार आहे. टी२० विश्वचषक आगामी २ वर्षात असल्याने युवा खेळाडूंमध्ये संजू सॅमसन व मयंक अग्रवाल यांना संधी द्यावी.”
आयपीएल मध्ये द्यावी युवा खेळाडूंना संधी
कपिल देव यांच्या मते, “आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएलचे आयोजन करूनही तुम्ही अशाप्रकारचे निर्णय घेण्यास मागे-पुढे पाहता. टी२० क्रिकेट युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देते. जर आयपीएल नसते, तर त्याबद्दल विचार करण्याची गरज पडली नसती. परंतु आपल्याकडे आयपीएलसारखी स्पर्धा आहे. त्यामुळे आपल्याला युवा खेळाडूंचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.”
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत पंड्याने चमकदार कामगिरी केली. त्याने ३ सामने खेळताना ३९ च्या सरासरीने ७८ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर
बचके रेहना इंडिया वालो! कसोटी मालिकेपूर्वी सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला इशारा, म्हणाला…
“मी तयारी करून आलो आहे”, कसोटी मालिकेआधी युवा भारतीय खेळाडूचे वक्तव्य