मुंबईचे वानखेडे स्टेडिअम विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यासाठी सज्ज झाले आहे. बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ या सामन्यात आमने-सामने असणार आहेत. अशात या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी विश्वविजेता खेळाडू एस श्रीसंत याने रोहित शर्मा याच्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने म्हटले आहे की, रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गेमचेंजर ठरू शकतो. तसेच, त्याला असाही विश्वास आहे की, रोहित या सामन्यात शतक ठोकत संघाला अंतिम सामन्यात नेईल.
यजमान भारतीय संघाने (Team India) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सर्व 9 साखळी सामने जिंकले आहेत. यासह भारताने साखळी फेरीनंतर पॉईंट्स टेबलमधील अव्वलस्थान कायम ठेवले. तसेच न्यूझीलंड संघ 4 पराभव आणि 5 विजयांसह पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी राहिला.
जेव्हाही आयसीसी बादफेरींचा विषय येतो, तेव्हा न्यूझीलंड संघाचे पारडे भारतापेक्षा नेहमीच जड राहिले आहे. मात्र, एस श्रीसंत (S Sreesanth) याला विश्वास आहे की, भारतीय संघ बुधवारी मुंबईत बाजी मारेल.
स्पोर्ट्सकीडा या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना श्रीसंत याने संवाद साधला. दरम्यान त्याला पहिल्या उपांत्य सामन्यात चमकदार कामगिरी करेल, अशा एका खेळाडूची निवड करायला सांगितली. डोक्याला जरा ताण दिल्यानंतर श्रीसंत उत्तरला, “शर्माजींचा मुलगा, रोहित शर्मा. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो भारतासाठी गेमचेंजर ठरेल. त्याने आशिया चषकात शानदार खेळी केली होती. मला वाटते की, उद्या तो वानखेडेत कर्णधाराला साजेशी कामगिरी करेल. हे त्याचे होम ग्राऊंड आहे. तो सज्ज असेल आणि चाहतेही त्याला पाठिंबा देतील.”
भारताचा 40 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत याने असेही म्हटले की, रोहित 2011 वनडे विश्वचषकात घरच्या मैदानावर गमावलेली संधी भरून काढण्यासाठी उत्सुक असेल. “2011मध्ये संघात निवड होण्यासाठी तो पात्र होता, पण त्याची निवड झाली नाही. ते कुठेतरी त्याच्या डोक्यात असेल. मला वाटते की, भारत उपांत्य सामना जिंकेल आणि रोहित आणखी एका शतकासह अहमदाबादला अंतिम सामना खेळेल. तो यावेळी मोठी शतकी खेळी करेल,” असे 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिलेला एस श्रीसंत म्हणाला.
रोहितचे जबरदस्त प्रदर्शन
रोहित शर्मा सध्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात त्याने 55.89च्या सरासरीने 503 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांचाही पाऊस पाडला आहे. 131 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी आहे. (he will score big hundred former indian cricketer s sreesanth predicts game changer india 2023 world cup semi final new zealand)
हेही वाचा-
World Cup: जगात कुणालाच न जमलेला पराक्रम करणारा रोहित एकमेव फलंदाज, वाचून शॉकच बसेल
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’