अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२९मे) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील विजयाने त्यांनी पदार्पणातच विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला आहे.
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. यावेळी त्यांचा सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक धावा अशा ३९ धावा केल्या, तर बाकीचे फलंदाज गुजरातच्या माऱ्यासमोर फार काळ टिकले नाही. यामुळे त्यांनी २० षटकात ९ विकेट्स गमावत १३० धावा केल्या.
विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने वृद्धिमान साहाची विकेट लवकरच गमावली. तर दुसरीकडून सलामीवर शुबमन गिलने संथ फलंदाजी सुरूच ठेवत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मॅथ्यू वेड स्वस्तात बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार हार्दिक पंड्याने ३४ धावा केल्या.
हार्दिकची विकेट गेल्यावर गिल आणि डेविड मिलर यांनी सावरत फलंदाजी केली. मिलरने झटपट नाबाद ३२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली. तर गिलने ४३ चेंडूत एक षटकार आणि ३ चौकार फटकावत नाबाद ४५ धावा करत या अंतिम सामन्यातील सर्वाधिक धावांची खेळी केली आहे.
आतापर्यंत आयपीएलचे पंधरा हंगाम खेळले गेले असून त्यातील अंतिम सामन्यात कोणत्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत हे पाहुया,
आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
२००८ – युसुफ पठाण (५६)
२००९ – हर्षेल गिब्ज (नाबाद ५३)
२०१० – सुरेश रैना (नाबाद ५७)
२०११ – मुरली विजय (९५)
२०१२ – मनविंदर बिस्ला (८९)
२०१३ – एमएस धोनी ( नाबाद ६३)
२०१४ – वृद्धिमान साहा (नाबाद ११५)
२०१५ – लेंडल सिमन्स (६८)
२०१६ – ख्रिस गेल (७६)
२०१७ – स्टिव स्मिथ (५१)
२०१८ – शेन वॉटसन (नाबाद ११७)
२०१९ – शेन वॉटसन (८०)
२०२० – रोहित शर्मा (६८)
२०२१ – फाफ डु प्लेसीस (८६)
२०२२ – शुबमन गिल (नाबाद ४५)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीला आड आला, तो नेहमीच पाण्यात गेला! मुंबई, सीएसकेसारखं संजूच्या टीमचंही भंगल स्वप्न
IPL 2022 I ट्रॉफी विजयाचं सुख नाही पण ‘हे’ सुख मात्र राजस्थानच्या वाट्याला नक्कीच आलंय