भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकात खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ 14 जणांच्या सदस्यांसह ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. यामधील काही खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. त्यातील एक खेळाडू म्हणजे युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. त्याने याचवर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हा आठव्या टी20 विश्वचषकात खेळणारा भारताचा युवा खेळाडू आहे. नुकतेच त्याने चहल टीव्हीशी बोलताना त्याचा अनुभव शेयर केला आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेयर केला आहे. यामध्ये भारताचा स्पिनर युझवेंद्र चहल याच्यासोबत अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा आणि हर्षल पटेल यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यावेळी चहलने अर्शदीपला पहिल्यांदा विश्वचषक खेळत असून त्याबद्दल काय वाटते, असा प्रश्न विचारला. तेव्हा अर्शदीपने उत्तर देताना म्हटले, “भारताचे ब्लेझर घालताना छाती गर्वाने फुलून येते आणि हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि गर्वाचा क्षण आहे.”
अर्शदीपने खूप कमी वेळात भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. त्याने 15व्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच त्याची भारतीय संघात एंट्री झाली आहे. त्याने आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या प्रभावशाली गोलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्याने आयपीएलच्या 37 सामन्यांमध्ये 40 विकेट्स घेतल्या.
चहल टीव्हीमध्ये पुन्हा एक प्रश्न अर्शदीपला विचारला गेला. त्याला चहलने विचारले, चाहत्यांना काय सांगायचे आहे? यावर अर्शदीप उत्तरला, “तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आम्ही आमचा बेस्ट देत राहू.”
या व्हिडिओमध्ये चहलने दीपक हुड्डाला देखील तुझाही हा पहिलाच विश्वचषक असून त्याबद्दल काही बोलायचे आहे का हा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना तो म्हणाला, “मलाही ब्लेझर घातल्यावर गर्व वाटला, मात्र मी थोडा चिंताग्रस्तही (नर्व्हस) होतो.”
Chahal TV 📺 from Down Under 👏 👏@yuzi_chahal chats up with @HarshalPatel23, @HoodaOnFire & @arshdeepsinghh as the #TeamIndia quartet shares its excitement ahead of its maiden #T20WorldCup. 👍 👍 – By @RajalArora
Full interview 🎥 🔽https://t.co/65UeLbPunU pic.twitter.com/6EBZsONVjk
— BCCI (@BCCI) October 8, 2022
भारत विश्वचषकात 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी पहिला सामना खेळण्यापूर्वी दोन अभ्यास आणि दोन सराव सामने खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: हेंड्रिक्स-मारक्रमच्या ‘शतकीय’ भागीदारीने दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 278 धावांचे टारगेट
कमबॅक असावं तर असं! ऑस्ट्रेलियाला चोपत बटलरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थाटात पुनरागमन