मेलबर्न येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवली जात आहे. त्यामुळे भारताच्या विजयाने या स्पर्धेच्या गुणतालिकेतही बदल झाले. भारतीय संघाने न्यूझीलंडला मागे टाकून यात दुसऱ्या स्थानी आगेकूच केली.
मेलबर्नमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाचेही नुकसान झाले आहे. मात्र ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी कायम आहेत. भारताने दुसरे स्थान पटकावल्यामुळे न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यावर त्यांच्याही गुणांमध्ये बदल होणार आहेत.
Australia lose four ICC World Test Championship points and get fined 40% of their match fee for maintaining a slow over-rate against India in the second #AUSvIND Test.
More 👉 https://t.co/0hXoePpqel pic.twitter.com/WFCTvnkus6
— ICC (@ICC) December 29, 2020
सध्या या यादीत अव्वल स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विजयाची टक्केवारी ७७ आहे. तर मेलबर्नमधील विजयाने भारताने आपली टक्केवारी सुधारत ७२ वर नेली आहे. न्यूझीलंड ६२% सह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडची विजयाची टक्केवारी ६० असून पाकिस्तान ३९% सह पाचव्या स्थानावर आहेत.
इतर स्पर्धांप्रमाणेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलाही कोरोना महामारीचा फटका बसला होता. या स्पर्धेतील काही सामने त्यामुळे रद्द करावे लागले होते. अशावेळी परिस्थती लक्षात घेऊन आयसीसीने या स्पर्धेसाठी नवीन नियम लागू केले. आता या स्पर्धेत संघांनी प्राप्त केलेल्या गुणांवर नव्हे तर विजयाच्या टक्केवारीवर संघांची क्रमवारी निश्चित केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– NZ vs PAK: न्यूझीलंडने फास आवळला, पहिल्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत
– SA vs SL: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी