भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-20 सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरमध्ये आयोजित केला गेला आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर याठिकाणी खेळला जाणारा हा सामना निर्णायक ठरेल. 2-1 अशा आघाडीवर असणाऱ्या भारताकडे मालिका जिंकण्याची, तर ऑस्ट्रेलियाकडे बरोबरी करण्याची संधी आहे. पण त्याआधी स्टेडियमध्ये मुलभूत सुविधा किती मोठ्या प्रमाणात गैरसोय समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघ मालिकेतील चौथा आणि निर्णायक टी-20 सामना खेळण्यासाठी तयार आहेत. या सामन्यासाठी स्टेडियमच्या प्रशासनापुढे मोठी अडचण उभी राहिली. ऐन सामन्यावेळी स्टेडियममध्ये वीज नसल्याचे समोर येत आहे. माहितीनुसार स्टेडियमने वीज वितरण कंपनीचे तब्बल 3.16 कोटी रुपये वीज बील थकवले आहे. याच कारणास्तव ही कारवाई केली गेल्याचे समोर येत आहे.
अधिकची माहिती अशी की, हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीवरून स्टेडियममध्ये तात्पुरते वीज कनेक्शन दिले गेले आहे. पण केवळ प्रेक्षक बसणारे स्टॅन्ड्स आणि बॉक्स याठिकाणी वीज कनेक्शन दिले जाणार आहे. स्टेडियममध्ये सामना खेळण्यासाठी फ्लडलाईट्स जनरेटर वापरून चालवाव्या लागणीत.
No electricity at Raipur stadium hosting India Vs Australia T20 Today. The stadium has an outstanding bill of ₹ 3.16 crore, due to which the electricity connection at the stadium had been cut 5 years ago. [NDTV]#INDvsAUS pic.twitter.com/GAQAwk2rgI
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) December 1, 2023
दरम्यान, उभय संघांतील ही मालिका पाच सामन्यांची असून भारतीय संघात युवा खेळाडू आहेत. पहिल्या दोन सामन्यात भारताने अनुक्रमे 2 विकेट्स आणि 44 धावांनी विकेट्स विजय मिळवला. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने मोठी धावसंख्या केली. पण ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल याने झंजावाती शतक ठोकले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शुक्रवारी मालिकेतील चौथा सामना भारताने जिंकला, तर भारतीय संघ मालिका देखील जिंकेल. तसेच मालिकेती पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी (3 डिसेंबर) बेंगलोरमध्ये आयोजित केला गेला आहे. (IND Vs AUS 4th t20i Electricity to Raipur Cricket Stadium has been cut off due to overdue electricity bills)
महत्वाच्या बातम्या –
कोहली आफ्रिकेविरूद्ध वनडे आणि टी20 खेळत नसल्याने डिव्हिलियर्स नाराज; म्हणाला, ‘त्याने शक्य तितक्या…’
नागराज मंजुळेंनी शड्डू ठोकला! बहुचर्चित ‘खाशाबा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात