भारत आणि इंग्लंड संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यास अवघ्या एका दिवसाचा कालावधी उरला आहे. शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरील कसोटी सामन्याने या मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. तत्पुर्वी भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. परंतु पहिल्या कसोटी सामन्याची प्लेइंग इलेव्हन अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे सर्वांना या सामन्यातील ‘विराटसेना’ कशी असेल?, याची उत्सुकता लागली आहे.
भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात. तिसऱ्या क्रमांकावर ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजारा फलंदाजी करेल. तर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची जोडी अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील.
तसेच आघाडीचे पाचही फलंदाज बाद झाल्यानंतर रिषभ पंत दमदार कामगिरी करत संघाला चांगला शेवट करून देण्याची क्षमता राखतो. त्या अनुशंगाने पंतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले जाऊ शकते. तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर असेल. युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि अनुभवी क्रिकेटपटू आर अश्विन यांना अष्टपैलूच्या भूमिकेत संघात सहभागी करण्यात येईल.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ‘चायनामन’ कुलदिप यांना अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळू शकते. मोहम्मद सिराजचे मागील कसोटी मालिकेतील प्रदर्शन पाहता कर्णधार विराट त्याला संधी देण्याचा विचार करू शकतो. परंतु अनुभवामुळे इशांत शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.
भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा/मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
भारत का इंग्लंड, चेन्नई कसोटीत कोणाचे पारडे जड? ‘अशी’ आहे आकडेवारी