भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांची रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका भारतात आयोजित केली जातेय. पहिली कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. तर, दुसरी कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. मात्र, कानपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हिंदू महासभेने सामना उधळून लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे काही चिंता निर्माण झाल्या होत्या. आता बीसीसीआय हा कसोटी सामना कानपूरमधून हलवण्याचा विचार करत आहे का? या संपूर्ण प्रकरणाबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी विशेष माहिती दिली आहे.
बांगलादेशातील राजकीय बदलांमुळे हिंदूंवर कथित हिंसाचार सुरू झाला. अशा स्थितीत भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी उजव्या विचारसरणीच्या हिंदू महासभेकडून काही धमक्या देण्यात आल्या होत्या. पाहुण्या संघाचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, बीसीसीआयच्या जवळच्या सूत्राने सांगितले आहे की, ते सामन्यासाठी इतर कोणत्याही ठिकाणाचा विचार करत नाहीत आणि सामना योजनेनुसारच होईल.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘होय, आम्ही या धोक्याचे निरीक्षण करत आहोत आणि अधिकाऱ्यांशीही बोलत आहोत. मात्र, हा सामना व्हावा यासाठी आम्ही सर्व काही केले आहे. आमच्या आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्टेडियम सज्ज झालेय. हा सामना इतर कोठेही खेळला जाणार नसून, कानपूरमध्ये होणार आहे. परंतु आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कानपूरमध्येच नाही तर इतर ठिकाणीही आमचे लक्ष असेल.”
पहिल्या सामन्यासाठी यातून निवडणार संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
हेही वाचा –
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!
बीसीसीआयनं ज्याला बाहेर केलं, त्यानं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं! टीकाकारांना सडेतोड उत्तर
मोहम्मद शमी पत्नीला पोटगी म्हणून महिन्याला किती रुपये देतो? आकडा धक्कादायक!