भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ जवळपास 2 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच या फलंदाजाने गुवाहाटी येथे आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात 383 चेंडूत 379 धावांची विक्रमी खेळी केली. जुलै 2021 मध्ये त्याने श्रीलंका दौऱ्यावर भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. रणजीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. या खेळीच्या जोरावर पृथ्वीचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध विक्रमी खेळी खेळणारा मुंबईचा स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने दिल्लीमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही. या सामन्यात त्याला 40 आणि 16 धावाच करता आल्या. त्यांच्या संघालाही 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) टी-20 मालिकेसाठी पृथ्वीचा भारतीय संघात (Team India) समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. यानंतर तो कोणत्याही क्रिकेट प्रकारात भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही.
पृथ्वी शॉच्या एक्स गर्लफ्रेंडचा साखरपुडा
आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असलेल्या पृथ्वीशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. पृथ्वीची एक्स गर्लफ्रेंड प्राची सिंग (Prachi Singh) ही मॅाडेल असून तिचा साखरपूडा संगीतकार मधुर शर्मा (Madhur Sharma) याच्यासोबत झाला आहे. प्राचीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत “नवीन सुरुवात” असे कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/Cnesz8bPmFD/?utm_source=ig_embed&ig_rid=c27a6654-1bd6-46bd-9317-98873480ef8f
यावरून असे दिसून येते की, दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. पृथ्वी आणि प्राचीचे नाव खूप दिवसांपासून जोडले गेले होते. दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करायचे. 2022 मध्ये पृथ्वी आणि प्राचीने नवीन वर्ष एकत्र साजरे केले होते.
https://www.instagram.com/p/Cnmfmq7JxOo/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
अचानक दोघांनीही काही काळ एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. मात्र, दोघांनी याबाबत कुठेही भाष्य केले नाही. पृथ्वी सध्या निधी तापडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर निधीने त्याचे सोशल मीडियावर अभिनंदनही केले. 22 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री निधीसाठी पृथ्वी सोशल मीडियावर लोकांशी भिडला होता. (Indian cricketer Prithvi Shaw ex girlfriend Prachi Singh engagement with singer Madhur Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुबमन मला फेडररसारखा वाटतो’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने गायले गिलचे गोडवे
“जास्तीत जास्त टी10 लीग खेळवा”, भारताच्या जगज्जेत्या खेळाडूंनी केली मागणी