दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा आणि एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकला. या विजयानंतर तीन सामन्यांची ही एकदिवसीय मालिका देखील भारताच्याच नावावर झाली. भारातने या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय संघाचा चालू वर्षीतील हा एकूण 38 वा विजय ठरला आहे. मंगळवारी (11 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटचा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर भारताने खास विक्रमाची नोंदही केली आहे.
भारतीय संघ आता क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ बनला आहे. यापूर्वी हा विक्रम एकट्या ऑस्ट्रेलियान संघाच्या नावावर होता. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या यादीत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 2003 साली एका वर्षा सर्वाधिक 38 विजय मिळवले होते. आता भारताने त्यांची बरोबरी करत यावर्षी एकूण 38 विजय मिळवले आहेत. असे असले तरी चालू वर्ष संपण्यासाठी अजून काही महिने बाकी आहेत. अशात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पछाडेल यात शंका नाही. यादीत तिसऱ्या क्रमांकावर देखील भारताचेच नाव आहे. भारताने 2017 मध्येही एकूण 37 विजय मिळवले होते, त्यामुळे तिसरा क्रमांक देखील भारतीय संघाच्याच नावावर आहे.
एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारे संघ
38 – ऑस्ट्रेलिया (2003)
38 – भारत (2022*)
37 – भारत (2017)
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या आफ्रिकी संघाला स्वस्तात बाद केले. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिका संघ अवघ्या 27.1 षटकात 99 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य अवघ्या 19.1 षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
भारतासाठी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने 18 धावा खर्च करून सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि वॉशिंगटन सुंदर यांनी प्रत्येकीत दोन-दोन विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धवन लवकरच करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण! हुमा कुरेशीसोबत डान्स करतानाचे फोटो व्हायरल
दिल्ली काबीज करत टीम इंडियाचा मोठा कारनामा! चालू वर्षात सोडली नाही एकही ट्रॉफी