कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) बुधवारपासून सुरू झाली. ही मालिका ईडन गार्डन स्टेडियमवर खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यातून भारतीय संघाकडून रवी बिश्नोईने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आहे. तो भारताकडून टी२० खेळणारा ९५ खेळाडू ठरला आहे. तसेच हे बिश्नोईचे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील आहे. त्याला पदार्पणाची कॅप युजवेंद्र चहलच्या हस्ते देण्यात आली.
तसेच या सामन्यासाठी भारतीय संघाने ५ फलंदाजांना आणि १ अष्टपैलू खेळाडूला खेळवले होते. त्याचबरोबर संघात २ फिरकी गोलंदाजांनाही संधी दिली असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी सांगितले. भारतीय संघाकडून सलामीसाठी रोहितबरोबर इशान किशनला संधी देण्यात आली, तर अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यरला संधी दिली. मात्र, या सामन्याच्या अंतिम ११ जणांच्या संघातून श्रेयस अय्यरला बाहेर ठेवण्यात आले होते.
Congratulations to Ravi Bishnoi who is all set to make his debut for Team India.@Paytm #INDvWI pic.twitter.com/LpuE9QuUkk
— BCCI (@BCCI) February 16, 2022
वेस्ट इंडिजसाठी आनंदाची बातमी म्हणजे नियमित कर्णधार कायरन पोलार्ड दुखापतीतून सावरून त्याने संघात पुनरागमन केले. मात्र वेस्ट इंडिज संघातून या सामन्यासाठी जेसन होल्डर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात रोस्टन चेसला संधी देण्यात आली आहे.
Captain @ImRo45 wins the toss and elects to bowl first in the 1st T20I.
Live – https://t.co/dSGcIkX1sx #INDvWI @Paytm pic.twitter.com/MYahWGfY8R
— BCCI (@BCCI) February 16, 2022
आमने-सामने इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत १७ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १० सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर ६ सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तसेच १ सामन्याच्या निकाल लागलेला नव्हता.
अंतिम ११ जणांचे दोन्ही संघ
भारत – इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल.
वेस्ट इंडिज – ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल, कायरन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसैन, ओडियन स्मिथ, फॅबियन ऍलन, शेल्डन कॉट्रेल
महत्त्वाच्या बातम्या –
“इंग्लंडने आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यापासून रोखावे”
….आणि चारू शर्मांनी सुंदरची बोली वाढवली ५० लाखांनी! वाचा काय घडले लिलावावेळी
आयपीएल २०२२ खरंच वेगळं असणार! ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंशिवाय खेळला जाणार यंदाचा हंगाम