नवी दिल्ली। आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणारा संघ चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल २०२० या हंगामात २ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) दुबई येथे चेन्नई संघ सनरायझर्स हैदराबाद संघाशी भिडणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईचा संघ ८ व्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद संघ ७व्या क्रमांकावर आहे. अशामध्ये दोन्ही संघ स्पर्धेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात सर्वांचे लक्ष चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीवर असेल. या सामन्यात धोनी आपल्या कोणत्या खेळाडूसोबत मैदानावर उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल तसेच हैदराबाद संघातही काही बदल पाहायला मिळू शकतात.
कोण संघात कोण बाहेर?
चेन्नई संघाला मुंबईविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात विजयाया नायक ठरलेला अंबाती रायडू दुखापतीमुळे पुढील २ सामने खेळू शकला नव्हता. सोबतच अष्टपैलू ड्वेन ब्राव्होही कॅरिबियिन प्रीमियर लीगमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. त्यानेही आतापर्यंत आयपीएल २०२०मधील एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईचे सीईओ के विश्वनाथन यांनी म्हटले आहे की, रायडू आणि ब्राव्हो दोघेही निवडीसाठी उपलब्ध आहेत. रायडू फीट असल्यामुळे तो चेन्नईचा खराब फॉर्ममध्ये असलेला फलंदाज मुरली विजयची जागा घेऊ शकतो. परंतु ब्राव्होच्या बाबतीत अद्याप काही सांगता येणार नाही. कारण त्याला अंतिम अकरामध्ये घेण्यासाठी एमएस धोनीला संपूर्ण फलंदाजी क्रमामध्येच बदल करावा लागेल.
सनरायझर्स हैदराबाद संघात बदल
दुसरीकडे केन विलियम्सनच्या येण्याने सनरायझर्स संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या २ पराभवानंतर आपला पहिला विजय मिळवला होता. जॉनी बेयरस्टो आणि डेविड वॉर्नरही चांगले योगदान देत आहेत. अशामध्ये संघ विजयाची भूमिका पुढेही कायम राखण्याचा प्रयत्न करेल. सनरायझर्स संघाला जर यश मिळवायचे असेल, तर त्यांना मधल्या फळीत एक चांगल्या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता आहे. कारण बेयरस्टो, वॉर्नर आणि विलियम्सन यांच्या अयशस्वी होण्याने संघ चिंतेत पडू शकतो.
महास्पोर्स्ट्स ड्रीम ११
अंबाती रायडू, एमएस धोनी, फाफ डू प्लेसिस, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, राशिद खान, डेविड वॉर्नर, दीपक चाहर, शेन वॉटसन, प्रियम गर्ग, टी नटराजन
दोन्ही संघ
चेन्नई सुपर किंग्स-
एमएस धोनी (कर्णधार/ यष्टीरक्षक), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एन्गिडी, दीपक चाहर, पीयुष चावला, इमरान ताहिर, मिशेल सँटनर, जॉश हेजलवूड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा
सनरायझर्स हैदराबाद-
डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन, बासिल थंपी