इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमाला येत्या 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबईत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.
आयपीएलमध्ये लोकप्रिय असलेल्या संघांमध्ये मुंबई, चेन्नईबरोबच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही समावेश होता. नुकतेच बेंगलोर संघाने त्यांचा लोगो बदललेला आहे. त्यामुळे या नवीन लोगोसह ते यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
बेंगलोर संघाने आत्तापर्यंत आयपीएलच्या सर्व 12 मोसमात सहभाग घेतला आहे. मात्र त्यांना विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. त्यांनी 2009, 2011 आणि 2016 असे तीन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र तिन्हीवेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना अजून पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे.
यावर्षीच्या आयपीएलसाठी बेंगलोर संघाने ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन अशा स्टार परदेशी खेळाडूंना संघात समील केले आहे. तसेच त्यांच्या संघात विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव, शिवम दुबे, नवदीप सैनी असे खेळाडू कायम आहेत.
बेंगलोरचा यावर्षीचा पहिला सामना 31 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध घरच्या मैदानावर बंगळुरु येथे खेळणार आहे. या मोसमात बेंगलोरच्या साखळी फेरीतील 14 सामन्यांपैकी 12 सामने रात्री 8 वाजता सुरु होतील. तर 5 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध होणारा सामना आणि 3 मेला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध होणारा सामना दुपारी 4 वाजता सुरु होईल.
Chinnaswamy, here we come! Block your calendars! #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/nfXvSzQGAb
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 15, 2020
आयपीएलचा हा 13 वा मोसम यावर्षी 50 दिवसांचा असणार आहे. 29 मार्च ते 17 मे पर्यंत या आयपीएल मोसमातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
तसेच यावर्षी आयपीएलमध्ये केवळ रविवारीच डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने 4 वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने 8 वाजता सुरु होतील.
Up & away, we are coming your way! Mark your calendars. #PlayBold #NewDecadeNewRCB pic.twitter.com/72elgDkGUI
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 15, 2020
असे आहे आयपीएल 2020मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
31 मार्च, मंगळवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – बंगळुरु, रात्री 8 वाजता
5 एप्रिल, रविवार: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – मुंबई, दुुपारी 4 वाजता
7 एप्रिल, मंगळवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद – बंगळुरु, रात्री 8 वाजता
10 एप्रिल, शुक्रवार: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – दिल्ली – रात्री 8 वाजता
14 एप्रिल, मंगळवार: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – मोहाली, रात्री 8 वाजता
18 एप्रिल, शनिवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स – बंगळुरु, रात्री 8 वाजता
22 एप्रिल, बुधवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – बंगळुरु, रात्री 8 वाजता
25 एप्रिल, शनिवारः राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – जयपूर, रात्री 8 वाजता
27 एप्रिल, सोमवारः चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – चेन्नई, रात्री 8 वाजता
3 मे, रविवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब – बेंगळुरू, दुपारी 4 वाजता
5 मे, मंगळवार: सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – हैद्राबाद, रात्री 8 वाजता
10 मे, रविवार: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – कोलकाता, रात्री 8 वाजता
14 मे, गुरुवार: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – बेंगळुरू, रात्री 8 वाजता
17 मे, रविवारः रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स – बेंगळुरू, रात्री 8 वाजता
आयपीएल 2020 साठी असा आहे रॉल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ –
विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरकीरतमन, देवदत्त पाडीक्कल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, ख्रिस मॉरिस, ऍरॉन फिंच , डेल स्टेन, केन रिचर्डसन, ईसूरु उडाना, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शहाबाज अहमद.
न्यूझीलंड विरुद्ध सराव सामन्यात मयंक अगरवाल, रिषभ पंत चमकले
वाचा-👉 https://t.co/PpaFZRast4👈#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020
आयपीएल २०२०: दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे असे आहे संपूर्ण वेळापत्रक
वाचा👉https://t.co/l80FkMWQsm👈#म #मराठी #Cricket #IPL2020 @KKRiders— Maha Sports (@Maha_Sports) February 16, 2020