दुबई। आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईच्या फलंदाजीला मात्र खास सुरुवात झाली नाही. परंतू पुढे मुंबईने चांगल्या धावा उभारल्या. या सामन्यात मुंबईविरुद्ध अश्विनने टिच्चून गोलंदाजी केली. या सामन्यात त्याने ४ षटकांत २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. याबरोबर आयपीएलमधील एक खास विक्रमही त्याने आपल्या नावावर केला.
आयपीएलच्या प्ले ऑफ, सेमीफायनल व अंतिम फायनलमध्ये मिळून अश्विनने आजपर्यंत एकूण १५ सामने खेळले आहेत. यातील तब्बल ३ सामन्यात त्याने ३ किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलच्या साखळी फेरीत अश्विनने १३७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३ वेळा ३ किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहे. या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की अश्विन खऱ्या अर्थाने साखळी फेरीपेक्षाही चांगली कामगिरी बाद फेरीत केली आहे.
२००९मध्ये आयपीएलचा पहिला सामना खेळलेल्या अश्विनने १५१ सामन्यात २६.७४च्या सरासरीने १३५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला आयपीएलमध्ये अजूनही सामन्यात ५ विकेट्स घेण्यात यश मिळाले नाही. परंतू सामन्यात ३ विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याने तब्बल ६ वेळा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित ‘नो’हिट! आयपीएलमधील अतिशय लाजीरवाणा विक्रम झाला नावावर
-ट्रेलब्लेझर्सच्या घातक गोलंदाजीसमोर मिताली राजच्या संघाने टेकले गुडघे; ९ विकेट्सने झाला पराभव
-Video: विराटने चक्क तलवारीने कापला केक, पाहा बर्थडे सेलिब्रिशन
ट्रेंडिंग लेख-
-आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!
-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!