मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १९ वा सामना रविवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. आयपीएलमधील हायवोल्टेज सामन्यांपैकी एक म्हणून या दोन्ही संघातील सामन्याकडे नेहमी पाहिले जाते. तसेच या सामन्याचे गेल्या काही वर्षापासून एक आकर्षण म्हणजे या दोन्ही संघांचे कर्णधार आणि त्यांची असलेली मैत्री. त्यामुळे त्यांच्याबद्दल चाहत्यांमध्येही मोठी चर्चा असते.
रविवारीही सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीवेळी चेन्नईचा कर्णधार धोनी आणि बेंगलोरचा कर्णधार विराट यांच्यातील असलेल्या मैत्रीचे सर्वांना दर्शन घडले. त्यामुळे त्यांचे फोटो काहीवेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेक चाहत्यांनी त्यांच्या फोटोला ‘ब्रोमान्स’ असेही कॅप्शन दिले आहे. तर काहींनी त्यांच्या जोडीचे ‘माहिराट’ असे नामकरण केले आहे. तर काहींनी त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे की ‘काही गोष्टी कधीच नाही बदलत’.
या फोटोमध्ये नाणेफेकीवेळी विराट धोनीच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याशी चर्चा करताना दिसला. तसचे दोघांमध्ये काही मजेशीर गप्पाही झाल्याचे त्यांच्या फोटोमधून दिसून येत आहे. तसेच जरी त्यांच्यात मैत्री असली तरी रविवारी मात्र सामन्यांत ते एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने नाणेफेक झाल्यानंतर दोघेही सामन्यात आमने-सामने येण्यासाठी आपापल्या संघाच्या दिशेने निघून गेले.
MAHIRAT🙌♥️ pic.twitter.com/Ktvj7029Jo
— Alaska (@alaskawhines) April 25, 2021
https://twitter.com/itsDevRA/status/1386280283100516355
https://twitter.com/harshini1849/status/1386256127176822787
And the bromance continues.. #MahiRat 💛❤ pic.twitter.com/jU7VDLebPr
— Celestial•ᴷᵒᵒᵏᵀᵃᵉˡᶦᶜᶦᵒᵘˢ⁷ | | 2025✨💜 (@saranYaSai_s) April 25, 2021
Maybe this will be the last year to see these two players in single frame. So enjoy each and every moment of the match irrespective of the match result.
Mahirat bromance 😍#RCBvsCSK https://t.co/WHsy24dIqr— CRAZY BOY 🦁 (@vinuu_17) April 25, 2021
The 2 men who made me love Bromance for first time.
All the best MahiRat 💙💛❤️
May the best team wins 🥰 pic.twitter.com/ahznT1FduJ— D ˢᶠ⁹ • IT IS L0VE ♥️ (@MinozFantasy225) April 25, 2021
https://twitter.com/itz_ArunDhoni/status/1386278283617079301
विराटने यापूर्वी धोनीबरोबरील फोटो केले आहेत पोस्ट
विराटने यापूर्वी सोशल मीडियावर अनेकदा धोनीबरोबरच फोटो भावून कॅप्शनसह शेअर केले आहेत. तसेच तो अनेकदा त्यांच्यातील मैत्रीबद्दल बोलला आहे. खरंतर विराट आणि धोनी अनेकवर्षे भारतीय संघाकडून एकत्र खेळले आहेत. तसेच विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणही धोनीच्या नेतृत्वाखाली झाले आहे. एवढेच नाही तर धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडे भारतीय संघाचे नियमित कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई आणि बेंगलोर संघांची दमदार सुरुवात
आयपीएल २०२१ हंगामाची सुरुवात चेन्नई आणि बेंगलोर संघांनी दमदार केली आहे. चेन्नईने पहिल्या चार सामन्यांतील तीन सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. तर बेंगलोरने पहिले चारही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: मॅक्सवेल मुद्दाम सोपा झेल डाईव्ह मारुन अवघड असल्याचे दाखवतो, चहलचा मोठा आरोप!
‘शुबमन गिल करेल आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा’, या दिग्गजाने वर्तवले भाकीत