आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने स्पर्धेत दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार असल्याची जाहीर केले होते. या दोन नवीन फ्रेंचायझी आहेत अहमदाबाद आणि लखनऊ. या दोन फ्रेंचायझींच्या येण्याने आयपीएलचा पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव देखील आयोजित केला जाणार आहे. आता अहमदाबाद फ्रेंचायझीविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे. भारताचा माजी वेगवना गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) या नवीन फ्रेंचायझीला प्रशिक्षण देताना दिसू शकतो.
नेहरासोबतच भारताला विश्वचषक जिंकवून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी (vikram solanki) हे देखील अहमदाबादच्या सपोर्ट स्टाफचा भाग असणार आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, अहमदाबाद फ्रेंचायझीच्या अधिकाऱ्यांनी या तिघांची मुलाखत घेतली आहे आणि आगामी हंगामासाठी त्यांची निवड देखील झाली आहे. दरम्यान, गॅरी कर्स्टन यांच्याकडे यापूर्वी संघाला प्रशिक्षक देण्याचा मोठा अनुभव आहे. तसेच, नेहरानेही यापूर्वी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, नेहरा (Ashish Nehra) अहमदाबाद फ्रेंचायझीच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे नेहराच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आयपीएलमध्ये ८८ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १०६ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी, त्याने आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला प्रशिक्षण दिले आहे.
गॅरी कर्स्टनचा विचार केला, तर त्यांच्याकडे संघाला प्रशिक्षण देण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने २०११ विश्वचषक जिंकला होता. त्याव्यतिरिक्त ते दक्षिण आफ्रिका संघाचेही मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. आयपीएलमध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेगलोरच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. कर्स्टन अहमदाबाद फ्रेचायझीचे मेंटर असणार आहेत.
इंग्लंड संघाचे माजी सलामीवीर फलंदाज विक्रम सोलंकी अहमदाबाद फ्रेंचायझीचे संचालक असतील. त्यांच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमधील ३२५ प्रथम श्रेणी सामन्यांचा आणि ४०२ लिस्ट ए सामन्यांना अनुभव आहे. तसेच त्यांनी ५१ एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या तिघांची नावे जरी निश्चित झाली असली, तर फ्रेंचायझीने अधिकृतपणे अजूपर्यत याबाबतीत कसलीही माहिती दिलेली नाही.
अशीही माहिती समोर आली आहे की, फ्रेंचायझी संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यरच्या नावावर विचार करत आहे आणि तो संघाचे नेतृत्व सांभाळू शकतो. मागच्या हंगामात अय्यरल दुखापतग्रस्त झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याच्याकडून संघाचे नेतृत्व काढून घेतले आणि रिषभ पंतला ही जबाबदारी दिली. अय्यरने नंतर संघात पुनरागमन केले. मात्र, त्याला संघाचे कर्णधारपद परत मिळाले नाही. अशाही बातम्या येत आहेत की, मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यादेखील अहमदाबाद फ्रेंचायझीत सामील होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या –
विराट-रहाणे आणि पुजाराला भारी पडला एकटा रूट! पाहा ही ‘अविश्वनिय’ आकडेवारी
साॅरी..साॅरी..! पहिल्याच सामन्यात मैदानावर कर्णधार राहुलला मागावी लागली माफी, पण का? पाहा व्हिडिओ
सचिन तंवरच्या ‘गोल्डन रेड’ने पटनाचा टायटन्सवर थरारक विजय
व्हिडिओ पाहा –