इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर सध्या त्याच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे आतापर्यंतचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बटलरने संघाला आतापर्यंत अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. शनिवारी (३० एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या बटलरने अर्धशतक साकारले आणि मोठा विक्रम नावावर केला.
जोस बटलर (Jos Buttler) चालू हंगामात तीन वेळा शतक करणारा फलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध शनिवारी डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर देखील तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. परंतु शतक करू शकला नाही. या सामन्यात बटलरने ५२ चेंडूत ६७ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ४ षटकार निघाले. या अर्धशतकी खेळीनंतर बटलरने चालू हंगामात वैयक्तिक ५६६ धावा पूर्ण केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात राजस्थानविषयी बटलर एकमेव खेळाडू ठरला, ज्याने अर्धशतक केले. या खेळीच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १५८ धावा केल्या. चालू हंगामातील जबरदस्त फॉर्मच्या जोरावर बटलर एखाद्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. आयपीएलच्या यापूर्वीच्या १४ हंगामात एकही फलंदाज राजस्थान संघासाठी बटलरप्रमाणे प्रदर्शन करू शकला नव्हता. यापूर्वी हा विक्रम अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नावावर होता, जो आता बटरलने मोडला आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आयपीएल २०१२ हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक ५६० धावांचे योगदान देणारा खेळाडू ठरला होता. आयपीएल २०२२ हंगामातील लीग स्टेजचे काही सामने शिल्लक असताना बटलरने ५६६ धावांच्या जोरावर रहाणेला पछाडले आहे. बटलरची हंगामातील धावसंख्या अजून वाढणार असून तो विराट कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम देखील मोडू शकतो.
एका आयपीएल हंगामात राजस्थानसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा बटलरचेच नाव येते. आयपीएल २०१८मध्ये त्याने ५४८ धावांचे योगदान दिले होते. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉटसन (Shane Watson) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉटसनने आयपीएल २०१३मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ५४३ धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर पुन्हा एकदा अजिंक्य रहाणे आहे, ज्याने आयपीएल २०१५मध्ये ५४० धावांचे योगदान दिले होते.
एका आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
५६६ धावा- जोस बटलर (२०२२)*
५६० धावा- अजिंक्य रहाणे (२०१२)
५४८ धावा- जोस बटलर (२०१८)
५४३ धावा- शेन वॉटसन (२०१३)
५४० धावा- अजिंक्य रहाणे (२०१५)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीबच फुटकं! खणखणीत अर्धशतक झळकावूनही विराट का होतोय ट्रोल? जाणून घ्या कारण
स्विगीच्या वाईट सेवेवर संतापला शुबमन गिल; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्ककडेच केली तक्रार
‘किंग खान’ थेट अमेरिकेत बांधणार वर्ल्ड क्लास क्रिकेट स्टेडिअम; एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही