चार सामने खेळून दोन विजय आणि दोन पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल) खेळला जाणार आहे. हा सामना बेंगलोरच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी याच्या फिटनेसविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
खरं तर, मागील सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) हा पायाच्या दुखापतीमुळे लंगडताना दिसला होता. मात्र, संघाचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी (Batting Coach Michael Hussey) याने धोनीच्या तब्येतीविषयी भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, धोनी आता बरे वाटत असल्याचे दिसत आहे.
झाले असे की, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर समोर आले होते की, धोनी पूर्णपणे फिट नाहीये. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याची पुष्टीदेखील केली होती. त्यांनी सांगितले होते की, “एमएस धोनीला दुखापत झाली आहे. तुम्ही त्याच्या काही चालण्यावरून पाहू शकता. अशी कोणतीतरी गोष्ट आहे, जी त्याला त्रास देत आहे.” यानंतर एक व्हिडिओही शेअर करण्यात आला, ज्यात धोनी लंगडताना दिसत होता. यानंतर असे तर्क लावले जात होते की, धोनी काही सामन्यांसाठी बाहेर होऊ शकतो.
A warrior. A veteran. A champion – The One and Only! 🦁
Full post match 📹 https://t.co/LuLJ13LVt3#CSKvRR #WhistlePodu #Yellove 💛 @msdhoni pic.twitter.com/dgsuPgT92y
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 13, 2023
मायकल हसीने धोनीच्या दुखापतीविषयी प्रतिक्रिया दिली. माध्यमांतील वृत्तांनुसार, “माझ्या मते, त्याला हा त्रास दीर्घकाळापासून होत आहे. त्याला जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत तो सांभाळत आहे. मात्र, तो ठीक वाटत आहे.”
यापूर्वी सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले होते की, त्यांना धोनीच्या या दुखापतीबाबत माहिती आहे. मात्र, त्यांना विश्वास आहे की, तो पुढील सर्व सामन्यांसाठी उपलब्ध राहील.
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 24वा सामना 17 एप्रिल रोजी बेंगलोर विरुद्ध चेन्नई संघात होणार आहे. या सामन्यात बेंगलोर मागील विजयासह उतरणार आहे, तर चेन्नईला शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता 24व्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ipl 2023 batting coach michael hussey eases concerns about ms dhoni s injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘2000 टक्के सांगतो एमएस धोनी यावर्षी आयपीएलमधून निवृत्त होणार’, माजी सहकाऱ्याचा मोठा दावा
राशिद खानविरुद्ध तळपली सॅमसनची बॅट, षटकारांची हॅट्रिक केल्यानंतर बनला मोठा विक्रम